श्री कृष्णाची आरती

श्री कृष्णाची आरती

श्री कृष्णाची आरती

ओवालू आरती मदनगोपाळा।

श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥

चरणकमल ज्याचे अति सुकुमार।

ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान।

ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी।

वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान।

तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

एका जनार्दनी देखियले रूप।

रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

– संत एकनाथ

 

श्रीकृष्णाच्या आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ

आरत्यांचा अर्थ काही वेळा समजण्यास कठीण असतो. अर्थ समजून घेऊन आरती म्हटल्यास भाववृद्धी लवकर होण्यास मदत होते. यासाठी प्रथम समजून घेऊया, श्रीकृष्णाच्या आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ.

१. ‘ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर ।’ म्हणजे चरणांवर सामुद्रिकशास्त्रानुसार ध्वज, वज्र आणि अंकुश दर्शविणार्‍या रेखा शुभचिन्ह असून, पायातले तोडे भक्तवात्सल्याचे जणू ब्रीद सांगत आहेत.

२. ‘ह्रदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।’ यातील ‘श्रीवत्सलांछन’ या शब्दाचा भावार्थ आहे, भक्तवत्सलता. श्रीविष्णूच्या ह्रदयातील त्याच्या भक्तांबद्दलचे वात्सल्य पदकाप्रमाणे शोभून दिसते.

अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद आपणास मिळो, अशी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना आहे.

श्रोत :- santsahitya.in

आरत्यांचा अर्थ काही वेळा समजण्यास कठीण असतो. अर्थ समजून घेऊन आरती म्हटल्यास भाववृद्धी लवकर होण्यास मदत होते. यासाठी प्रथम समजून घेऊया, श्रीकृष्णाच्या आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ.

2 thoughts on “श्री कृष्णाची आरती”

  1. कृपया मला श्री कृष्णा ची आरती अतिशय बरोबर मराठीत आणि चुका नसलेली शब्द अशी येग्या आरती पाहिजे.
    या आरती मध्ये श्रीवत्सलांछन की श्रीवत्सल छान आणि सुखाच्या कोटी की सूर्याच्या कोटी हे नक्की कोणते शब्द आहेत.

  2. राम कृष्ण हरी माऊली ||
    आपली शंका बरोबर आहे पण श्री कृष्ण आरती मध्ये श्रीवत्सल छान हा शब्द नसून श्रीवत्सलांछन हा शब्द बरोबर आहे आणि शब्दाचा अर्थ खाली अधोरेखित केलेला आहे
    धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहिती