श्री गणेश अथर्वशीर्ष

श्री गणेश अथर्वशीर्ष

 

सर्वप्रथम पूजनीय देवता गणपती भक्तांचे सर्व संकट दूर करतात. गणोशोत्सव दरम्यान भक्त गणेश भक्तीत मग्न असतात अशात देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजन, स्तोत्र पाठ आणि मंत्रोच्चारण करावे. सोबतच गणपती अथर्वशीर्ष स्त्रोताचा पाठ करणे फलदायी ठरतं. याचे पाठ केल्याने व्यक्तीच्या दु:खाचा अंत होतो. सर्व सिद्धी प्रा‍प्त होते. तसेच पाठ करताना पूजन करुन गणरायाला सुगंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. सोबतच गणपतीला प्रिय दूर्वा ‍अर्पित कराव्या. लाल फुलांची माळ अर्पित करावी. याने घरात सुखाचे आगमन होतं. सोबतच उच्चारण स्पष्ट असावं.

श्री गणेशाय नम:’
ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।
स्थिरै रंगै स्तुष्टुवां सहस्तनुभि::।
व्यशेम देवहितं यदायु:।1।

ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा:।
स्वस्ति न: पूषा विश्ववेदा:।
स्वस्ति न स्तार्क्ष्र्यो अरिष्ट नेमि:।।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।2।
ॐ शांति:। शांति:।। शांति:।।।

त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।।
त्वमेव केवलं कर्त्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्तासि।।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।।
त्वं साक्षादत्मासि नित्यम्।
ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि।।
अव त्वं मां।। अव वक्तारं।।
अव श्रोतारं। अवदातारं।।
अव धातारम अवानूचानमवशिष्यं।।
अव पश्चातात्।। अवं पुरस्तात्।।
अवोत्तरातात्।। अव दक्षिणात्तात्।।
अवचोर्ध्वात्तात्।। अवाधरात्तात्।।
सर्वतो माँ पाहि-पाहि समंतात्।।3।।

त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:।।
त्वं सच्चिदानंदा द्वितियोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।4।

सर्व जगदि‍दं त्वत्तो जायते।
सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति।।
सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति।।
त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभ:।।
त्वं चत्वारिवाक्पदानी।।5।।

त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्ति त्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्।
त्वं शक्तित्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं।
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्।।6।।

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।।
अनुस्वार: परतर:।। अर्धेन्दुलसितं।।
तारेण ऋद्धं।। एतत्तव मनुस्वरूपं।।
गकार: पूर्व रूपं अकारो मध्यरूपं।
अनुस्वारश्चान्त्य रूपं।। बिन्दुरूत्तर रूपं।।
नाद: संधानं।। संहिता संधि: सैषा गणेश विद्या।।
गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:।। ग‍णपति देवता।।
ॐ गं गणपतये नम:।।7।।

एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात।।
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्।।
रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम्।।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।।
रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम्।।8।।

भक्तानुकंपिन देवं जगत्कारणम्च्युतम्।।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम।।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर:।। 9।।

नमो व्रातपतये नमो गणपतये।। नम: प्रथमपत्तये।।
नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम:।।10।।

एतदथर्वशीर्ष योऽधीते।। स: ब्रह्मभूयाय कल्पते।।
स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वत: सुख मेधते।। 11।।

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।।
सायं प्रात: प्रयुंजानो पापोद्‍भवति।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति।।
धर्मार्थ काममोक्षं च विदंति।।12।।

इदमथर्वशीर्षम शिष्यायन देयम।।
यो यदि मोहाददास्यति स पापीयान भवति।।
सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत।।13 ।।

अनेन गणपतिमभिषिं‍चति स वाग्मी भ‍वति।।
चतुर्थत्यां मनश्रन्न जपति स विद्यावान् भवति।।
इत्यर्थर्वण वाक्यं।। ब्रह्माद्यारवरणं विद्यात् न विभेती कदाचनेति।।14।।

यो दूर्वां कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति।।
यो लाजैर्यजति स यशोवान भवति।। स: मेधावान भवति।।
यो मोदक सहस्त्रैण यजति।
स वांञ्छित फलम् वाप्नोति।।
य: साज्य समिभ्दर्भयजति, स सर्वं लभते स सर्वं लभते।।15।।

अष्टो ब्राह्मणानां सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति।।
सूर्य गृहे महानद्यां प्रतिभासंनिधौ वा जपत्वा सिद्ध मंत्रोन् भवति।।

महाविघ्नात्प्रमुच्यते।। महादोषात्प्रमुच्यते।। महापापात् प्रमुच्यते।स सर्व विद्भवति स सर्वविद्भवति। य एवं वेद इत्युपनिषद।।16।।

अर्थ

 

‘गण‘ म्हणजे अष्टवसूंचा समूह. ‘वसु’ म्हणजे दिशा, दिकपाल, दिक् देव म्हणून दिशांचा स्वामी आणि ‘पती’ तो गणपती. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत. म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीपूजन करतात. गणपतीने एकदा दिशा मोकळया केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती तिथे येऊ शकते. यालाच ‘महाद्वारपूजन’ किंवा ‘महागणपतीपूजन’ असे म्हणतात.याशिवाय ‘गण ‘ म्हणजे पवित्रके,जी अतिशय सूक्ष्मातिसूक्ष्म असतात म्हणून गणपती म्हणजे पवित्रकांचा स्वामी.

जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाया ‘तिर्यक’व ‘विस्फुटीत लहरींचा समूह’ म्हणजे ‘गण’,त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा तो गणपती. ह्या 360 वेगवेगळया लहरी अष्टदिशांमधून अव्याहतणे प्रवास करीत असतात. अशां या गणपतीची आराधना करतांना पूजा, उपवास व अर्थवशीर्षाची आर्वतले करतात. त्यापैकी पूजा ही षोडशोपचार करून प्राणप्रतिष्ठा करतात. धूप, दीप, नैवेद्य, आरती करून मूर्तीत प्राण जागृत करतात.

‘अथर्वशीर्ष‘- ‘थर्व’ म्हणजे गरम, ‘अथर्व’ म्हणजे शांती व ‘शीर्ष’ म्हणजे मस्तक. ‘ज्याच्या पुर0चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अर्थवशीर्ष होय’. यानंतर नैवेद्य, या नैवेद्यात परिपूर्ण आहारात मोदकाचा समावेश असतो.

मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे म्हणून त्याला ‘ज्ञानमोदक’ असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते. (मोदकाचे टोक हे त्याचे प्रतीक आहे.) पण अभ्यास करू लागल्यावर समजते की ज्ञान हे फारच मोठे आहे. मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो. पूजा करणारा गणेश लहरींनी सपृक्त व्हावा, हा पूजेचा उद्देश असतो.

ही संपृक्तता वाढविण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे ‘उत्तरपूजा’. उत्तरपूजेच्यावेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके एकदम बाहेर पडतात व पूजा करणाऱ्याला त्याचा लाभ होतो. गणपती हा बुध्दीदाता आहे म्हणून प्रथम ‘श्री गणेशायनम:’ असे लिहितात. ज्ञान ग्रहण केले तर ते शब्दबध्द करण्याचे काम सरस्वतीचे आहे. गणपती ही एकमेव देवता ‘शब्दभाषा’ म्हणजेच ‘नादभाषा’ जाणणारी देवता आहे.

आपण बोलतो ती नादभाषा गणपती समजू शकतो म्हणूनच तो लवकर प्रसन्न होणारा देव आहे. इतर देव बहुतांशी प्रकाशभाषा समजू शकतात. गणपती ही नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे. ‘गणेशविद्या’ म्हणजे ध्वनीवर आधारीत लेखशास्त्र. ‘गं’ हा बीजमंत्र नीट लिहिण्याच्या संदर्भात हा शब्द या अर्थाने गणपती अर्थवशीर्ष या स्तोत्रात वापरलेला आहे. अशी ही गणपती देवता व तिचे पूजन भक्तिभावाने केल्यास तसेच दररोज गणेशाला नमन केल्यास प्रत्येकाला त्याचा जरूर अध्यात्मिक फायदा होतो.

 

पूजा कशी करावी ?

 

पूजा करतांना लाल वस्त्र, तांबडे फूल व रक्तचंदन वापरतात. लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीक़डे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात व मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. गणपतीला दुर्वा आवडतात. म्हणजे गणपती दुर्वांनी आच्छादल्यामुळे मूर्तीच्या बाजूने दुर्वामचा वास निघायला लागतो.

हा गंध गणपतीच्या आकारात संप्रषित होतो म्हणून गणपतीच्या पवित्रकांच्या आकाराला या आकाराकडे येणे सोपे जाते यालाच मूर्ती जागृत झाली असे म्हणतात. याशिवाय शमीमध्ये ‘अग्नीचावास’ आहे व मंदार हे ‘एक वानस्पत्य रसायन’आहे म्हणून गणपतीला प्रिय आहे.उपास किंवा उपवास हे व्रत असून या व्रताची देवता ‘श्री सिध्दीविनायक’ आहे. सर्व चांगले व्हावे ह्याकरिता ‘विनायकी’ करतात. ‘संकष्टी’ ह्या व्रताची देवता ‘श्री विघ्नविनायक’ आहे.

विघ्न म्हणजे संकट, पृथ्वीपासून येणाऱ्या 360 लहरींनी आपण वेढले जातो. त्यामुळे शरीरातील प्रवाह बंदिस्त होतात व यालाच ‘संकट’ म्हणतात. कृष्ण पक्षात 360 लहरी जास्त प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे शरीराच्या नाडयांतील प्रवाह बंदिस्त होतात.

 

श्रोत :- webdunia

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहिती