श्री स्वामी समर्थांची आरती
स्वामी समर्थांची आरती
|| जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थां
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा || जयदेव जयदेव ||ध्रु||
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी|
जगदुध्दारासाठी राया तू फिरसी|
भक्त वत्सल खरा तू एक होसी|
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी ||१||
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार|
याची काय वर्णू लीला पामर |
शेषादीक शिणले नलगे त्या पार |
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ||२||
देवाधिदेव तू स्वामीराया|
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया |
तुजसी अर्पण केली आपली ही काया|
शरणागता तारी तू स्वामीराया ||३||
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले|
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे|
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले|
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे ||४||
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ||
- तीर्थक्षेत्र विषयी माहिती वाचण्यासाठी एथे क्लिक करा
- शेती विषयी माहिती वाचण्यासाठी आपल्या कृषी महाराष्ट्र ला नक्की भेट द्या.
|| जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थांआरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा || जयदेव जयदेव ||ध्रु||छेली खेडेग्रामी तू अवतरलासी|जगदुध्दारासाठी राया तू फिरसी|भक्त वत्सल खरा तू एक होसी|म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी ||१||त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार|याची काय वर्णू ला पामर |शेषादीक शिणले नलगे त्या पार |तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ||२||देवाधिदेव तू स्वामीराया|निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया |तुजसी अर्पण केली आपली ही काया|शरणागता तारी तू स्वामीराया ||३||अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले|र्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे|चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले|तुझ्या सूता नलगे चरणावेगळे ||४||अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ||