शिर्डी तीर्थक्षेत्र
शिर्डी साईबाबा मंदिर (shirdi saibaba temple) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.
शिर्डीला साईनगर देखील म्हणतात, हे शहर वेस्टर्न सीशोर लाइन (अहमदनगर – मनमाड रोड) या व्यस्त मार्गाच्या पूर्वेस १८५ कि.मी. आहे,
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री साईबाबा यांचे घर म्हणून शिर्डी प्रख्यात आहेत. शिर्डी येथे स्थित श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही सर्वात श्रीमंत मंदिर (संस्था) आहे.
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार शिर्डीची लोकसंख्या, ३६००४ होती. पुरुष लोकसंख्येपैकी ५३% आणि महिला ४७% आहेत. शिर्डीचा सरासरी साक्षरता दर ७०% आहे, जो राष्ट्रीय प्रमाना पेक्षा ५९. ५ % जास्त आहे: पुरुष साक्षरता ७६% आहे, आणि महिला साक्षरता ६२% आहे. शिर्डीमध्ये, लोकसंख्येपैकी १५% लोक 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत.
कार्य
साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला.
भक्त समुदाय
साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे
इतिहास
शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आ
ले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.
शिर्डी कसे जाणार
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी.आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले आहे. शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी बहुतेक गाड्या आहेत.शिर्डीला विमानतळ झाले आहे.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी.आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.कोपरगावपासून शिर्डी केवळ १५ कि.मी. आहे. श्रीरामपूर पासून शिर्डीचे अंतर साधारणपणे ३५ कि.मी.आहे.
श्रोत :- wikipedia.org