शनिप्रदोश

शनिप्रदोश

 

शनी साडेसाती, महादशा सुरु असलेल्यांनी महादेवांना समर्पित प्रदोष व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनी प्रदोष व्रताचरण कसे करावे, कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतात? जाणून घ्या…शनी साडेसाती, महादशा सुरु असलेल्यांनी महादेवांना समर्पित प्रदोष व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनी प्रदोष व्रताचरण कसे करावे, कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतात? जाणून घ्या…

आताच्या घडीला शनी मकर राशीत मार्गी चलनाने विराजमान आहे. मराठी वर्षातील शुभ मानला गेलेला कार्तिक महिना सुरू झाला आहे. चातुर्मासाची सांगता होत आहे. तुळशी विवाह, देवदिवाळी यांसारखे सण, व्रत-वैकल्ये नोव्हेंबर महिन्यात आहेत. या महिन्याच्या पहिल्याच शनिवारी शनी प्रदोष व्रत आहे. (shani pradosh vrat november 2022)

शास्त्रात सांगितले आहे की, प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनि प्रदोष व्रत म्हणतात. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी रवि नामक शुभ योग तयार होत आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. शनि प्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनि महाराजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

शनिवार, ५ नोव्हेंबर २०२२ रोजी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला शनी प्रदोष व्रत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्या व्यक्तींनी आवर्जून हे व्रत करावे, असा सल्लाही दिला जातो.

प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र ‘ओम नमः शिवाय’चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. यानंतर शनिदेवाची पूजा करावी आणि शनि चालिसाचे पठण करावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते आणि भगवान शंकराची कृपा देखील प्राप्त होते, असे म्हटले जाते.

शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनी देवाचे पूजन करण्यासह शनीदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनी देवांचे दर्शन घेणे चांगले मानले जाते.

शनि प्रदोष व्रताचरण करताना महादेवांच्या शिवलिंगावर १०८ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. शनिवारी हे करणे शुभ मानले जाते. यासोबतच यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तुंचे दान करावे. असे केल्याने तुमच्यावर ग्रहांचा अनुकूल प्रभाव पडतो आणि शनिदेवही प्रसन्न होतात, असे सांगितले जाते.

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मूळाशी पाणी आणि दूध अर्पण करावे. शक्य असल्यास पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यानंतर पितरांचे स्मरण करून पिंपळाची पूजा करावी. पूजा केल्यानंतर झाडाखाली हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे. पिंपळाला प्रदक्षिणा घालावी.

शनी प्रदोष व्रत मनापासून आचरल्यास तसेच महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते आणि मानसिक शांतीसोबतच शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते.

आताच्या घडीला धनु, मकर आणि कुंभ या राशींची साडेसाती सुरू आहे. तर मिथुन आणि तूळ राशीवर शनीच्या ढिय्या प्रभाव आहे. यावेळी या ५ राशीच्या लोकांवर शनीचा प्रतिकूल प्रभाव आहे. यासोबतच ज्या लोकांची शनीदशा, अंतर्दशा आणि महादशा आहे, त्यांनीही शनि प्रदोष व्रत करावे, असा सल्ला दिला जातो.

प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष तिथी शनिवारी येत असल्याने ती शनि प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते. शनी प्रदोष व्रताचे पालन केल्याने शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते. – सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

शनिप्रदोश शनिप्रदोश 

नवीन माहिती

या वेळेत एवढीच माहिती उपलब्ध आहे