संत जगमित्र नागा

संत जगमित्र नागा

 

संत जगमित्र नागा हे नामदेव समकालीन संत होऊन गेले. हे बहामनी काळातील मुस्लीम राजवटीतील संत होते. त्यांच्या एका आयुष्याचा संबंध मुसलमानी राज्याशी आला होता. पूर्वी परळी वैजनाथ व त्याचा परिसर मुसलमान सत्तेच्या अमलाखाली येत होता. संत सांवता माळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा व त्यांचा सर्व परिवार, श्रीज्ञानदेव श्रीनामदेव या सर्व संत मंडळीत ते अतिशय कनिष्ठ होते. वयाने लहान असल्यामळे ज्येष्ठ संतांच्या बाजूस उभे असत, असे मानण्यास हरकत नाही. ते समकालीन संतांच्या समवेत भजन कीर्तनाचा लाभ घेत असत, काही काळ नामदेवांच्या सान्निध्यात असल्याने रोज रात्री मंदिरात कीर्तन व हरिजागर नित्यनेमाने करीत असत. संतांच्या मांदियाळीतील जगमित्र नागा असल्याने, वारकरीपंथाची विठ्ठल भक्तीची परंपरा मनापासून पाळीत असत.

जगमित्र नागांच्या कीर्तनासाठी भक्ती संप्रदायातील संतांची, भक्त भाविकांची, गावकऱ्यांची फार मोठी गर्दी जमत असे. गावातील वंदनीय संतही संप्रदायाचया परंपरेप्रमाणे त्यांच्या चरणांचे मनस्वी दर्शन घेत असत. पण कित्येक जण संप्रदायाची भक्ती न मानणारे करणारे त्यांची निंदाही करत असत. गाव व परिसरातील अनेक भागवत पंथीय भक्त संत जगमित्रांबद्दल आदर करीत असत. गावात भिक्षा मागून उपजीविका करत असल्याने गावातील संत मंडळींनी एकदा एकी करून त्यांना एक जमिनीचा मोठा तुकडा दान म्हणूनही दिला होता; पण निरिच्छवृत्तीने वागणाच्या जगमित्रांनी ते इनाम नाकारले. हेतुरहित सेवाभाव करण्याची त्यांची वृत्ती असल्याने त्यांच्या मनी कोणताही आसक्तीभाव नव्हता… निरागस शांत वृत्तीचे सत्पुरुष म्हणून त्यांना सर्व जण ओळखत.

जीवन काळ

संत जगमित्र नागा यांचा काळ हा इ० स० १३३० ते १३८० असा मानला जातो. (इतिहास संशोधक वि० का० राजवाडे इ० स० १३३० असा जन्म साल । सांगतात) समाधी काळ हा कार्तिक शुद्ध एकादशी १३८० या इसवी सनावर अनेक संशोधकांचे एकमत आहे. संत नागांची समाधी परळी वैजनाथ येथे आजही आहे. संत जगमित्र नागांचा काळ हा अव्वल मुसलमानी सत्तेचा होता. त्यामुळे अनेक हिंदू देव-देवळांचा लोक दैवतांचा, भक्तिसमुहांचा नाश केला जात होता. धर्म आन रार्म होत चालला होता. हिंदूचे मुसलमानीकरण चालू होते. समाजाला समतेचा मंत्र देणाऱ्या, जातिनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष वृत्तीने एकत्र जगणारा, भावभक्ती भाग्यांनी बांधणारा संप्रदायातील एकमेव वारकऱ्यांचा नुकताच उदय झाला होता. या पार्श्वभूमीवर संत जगमित्र नागांनी मुसलमानी राजवटीत प्रतिकुल सामाजिक, धार्मिक परिस्थिती असताना जातीय एकतेचे श्रीज्ञानदेवांच्या विचाराने नामदेवांच्या मार्गदर्शनाने पारमार्थिक लोकसेवेचे कार्य केलेले आहे.

प्रचलित चमत्कार कथा

मध्यमयुगीन काळात समाजाला एकतेच्या विचारांची गरज होती. त्या काळचे समाजजीवन हे पूर्णतः धर्मप्रधान होते. धर्मातून निर्माण झालेल्या कर्मकांडांचे आणि रुढींचे मोठे प्रस्थ त्या काळात माजले होते. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे प्राबल्य होते. प्रत्येकाचे दैनंदिन जीवन धर्मकर्मानी व्यापलेले होते. त्या काळी स्मृतिरचनांना कायद्याचा मान होता, अशा वेळी सामान्य लोकांचा ईश्वरावर भरवसा ठेवण्यास काही चमत्काराची गरज असावी, असे वाटते. तसा संतांनी कोणताही चमत्कार कला नाही, तो त्यांचा मूळ स्वभावही नव्हता. केवळ भक्तांच्या संकटसमयी,ईश्वर त्याच्या पाठीशी ठाम उभा राहतो, त्याचे रक्षण करतो, ही भावना अनेक पुराणांच्या दृष्टीतून संत सांगत असतात. जगमित्र नागा ज्या गावात राहून कीर्तन करीत, त्या गावातील संत सज्जन लोक जगाचा मित्र म्हणून (जगमित्र) त्यांना आदराचे स्थान होते; परंतु त्याबरोबर गावातील अनेक लोक त्यांची निंदाही करीत असत; पण ते या गोष्टीकडे लक्ष देत नसत. संत श्रेष्ठ नामदेवांनी आपल्या गाथेमध्ये संत चरित्रातून (श्रीसकलसंतगाथा) काही चमत्कार कथा जगमित्रांबद्दल सांगितल्या आहेत. या । दोन्ही चमत्कार कथा त्यांच्या विठ्ठलभक्तीच्या संदर्भातील आहेत. भक्त संकटसमयी ईश्वराचा धावा करतो, आणि ईश्वर संकट निवारण करतो. असेच त्यांच्या चमत्कार कथांमधून सांगितले गेले,

‘एकदा आपल्या घरातील सर्व कुटुंबीय रात्री झोपले असता, जगमित्रांच्या घराला आग लागली. घरात अचानक उजेड दिसल्याने जगमित्र जागे झाले. घर जळताना घर वर वर जळत होते. झोपलेले घरातील सर्व जण सुखरूप होते. जगमित्रांनी पंढरीच्या पांडुरंगाचा धावा केला. अग्नीपासून देवाने कुटुंबाचे रक्षण केले. गावभर बातमी पसरली, लोक हळहळले. नागांसारख्या निःस्पृह संतांचे घर जळाले. घरातील एकालाही इजा झाली नाही. आश्चर्यचकित होऊन लोक म्हणू लागले, ‘भक्ता सहकारी असे नारायण किले निवारण विघ्नाचे त्या।’ गावकऱ्यांना सुद्धा जगमित्रांच्या साधुत्वाची खातरी पटली. यासंदर्भात जगमित्र नागा आपल्या अभंगात भक्ताच्या संकटसमयी ईश्वर कसा रक्षण करतो, यांचे काही पौराणिक दाखले दिले आहेत.

अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ १॥
आग्नि जाळी तरी न जळे गोपाळु । हृदयी देवकी बाळू म्हणोनिया॥ २॥
अग्नि जाळी तरी न जळती पांडव। हृदयी वासुदेव म्हणोनिया॥३॥
जगमित्र नागा न जळे जरी अग्नि जाळी। हृदयी वनमाळी म्हणोनिया ॥ ४ ॥

(जगमित्र नागा अ० क्र० १२) जगमित्र नागा म्हणतात, अग्नी जाळण्याचे काम करतो, पण ईश्वर त्यांच्या पाठीशी असतो, त्यामुळे भक्ताचे संकट टळते. नागांच्या धराला जरी आग लागली तरी घर मात्र जळाले नाही. कारण प्रत्यक्ष पांडुरंग आग विझविण्यासाठी घरी आले. ही जगमित्रांच्या घरी घडलेल्या घटनेबद्दल हा अभंग त्यांनी लिहिलेला असावा.

संत नामदेवकृत ‘संत चरित्रे’ (श्रीसकलसंतगारथा) या भागात जगमित्र नागांबद्दल दुसरी एक चमत्कार कथा सांगितली आहे. “परळी वैजनाथ येथे नवीन मुस्लीम राजसत्तेचा सुभेदार आला होता. त्याने जगमित्रांची गावकऱ्यांनी दिलेली जमीन जप्त केली. पण गावातील लोकांनी हे धर्मकार्य आहे. त्याच्या उत्पादन गरीबांना मदत दिली जाते; पण सुभेदाराने जुमानले नाही. उलट जगमित्र नागांच्या घरी जाऊन सुभेदार म्हणाला, “आमच्या घरी विवाहकार्य आहे, आमच्या दवात वाघ दैवत गरजेचे आहे, संध्याकाळी वाघ घेऊन घरी ये.”

“आमुचिया घरी मुलीचे लग्न। व्याघ्राचे कारण असे आम्हा॥
घेऊनिया आता यावे तुम्ही व्याघ्र। म्हणविता जगमित्रा पाहू कैसे॥”

जगमित्रांनी वाघ आणण्याचे कबूल केले, जगमित्रांनी विठ्ठलाचा धावा केला. वाघाची सुभेदाराने मागणी केली आहे; विठ्ठलाने शिष्यावर आलेले संकट ओळखले. स्वतः ईश्वराने वाघाचे रूप धारण केले. जगमित्रांजवळ वाघ आला. जगमित्रांनी वाघाला गावात आणले.

भयभित झाले तेव्हा ग्रामवासी। लावियेल्या वेशी गावाचिया॥
ग्रामवासियांनी लावियेले द्वार। करी विचार सुभेदार तेव्हा ॥
करी गर्जना भयानक व्याघ्र। कापती धरथर सकळ लोक॥”

तो वाघ घेऊन जगमित्र वेशीजवळ आले, वेशीची दारे बंद होती. एका डरकाळीत दारे उघडली. सामान्य लोक भयभीत झाले, जगमित्र नागांनी सर्वांना अभय दिले. तुम्ही भजन करीत राहा. जगमित्र सुभेदाराच्या घराजवळ आले आणि म्हणाले, ‘तुमचे दैवत आणले आहे, ते तुमच्या ताब्यात घ्या.’ पण सुभेदार बाहेर येईना, ‘तुमच्यामुळे सर्व गावाचा नाश होण्याची पाळी आली आहे,’ असे त्याच्या स्वीने सांगितले. तेव्हा सुभेदार बाहेर येऊन हात जोडून जगमित्रांना म्हणाला, ‘मला क्षमा करा. जगमित्रांना त्याची दया आली. त्या अभय दिले. वाघाला घेऊन पुन्हा ते वनात गेले.”

यासारख्या चमत्कार कथा अनेक संतांच्या संदर्भात घडून आलेल्या आहेत. ही कथा नामदेवांनी जगमित्रांच्या संदर्भात ‘श्रीसकलसंतगाथा’ मध्ये संतचरित्रात सांगितलेली आहे. त्यामुळे या कथांना तितकेच जास्त महत्त्व आहे. या कथा दीर्घ अभंग स्वरूपात नामदेवांनी विविध विषयांवर लिहिलेल्या पाहावयास मिळतात. वाङ्मयीन दृष्टीने सत्यतेच्या पातळीवर आशयाच्या बाबतीत त्या कथांचे मूल्य महत्त्वाचे वाटते. त्या केवळ ऐकीव माहितीवर आधारित कथा नाहीत, नामदेव- लिखित चमत्कार कथा आहेत. वारकरी संप्रदायात यासारख्या कथांना भक्ति- मार्गाच्या प्रवाहात फार महत्त्व आहे. भक्त आणि परमेश्वर यांचे भक्तीचे नाते यासारख्या कथांमधून उलगडत जाते. ईश्वराशी भक्ताचे असणारे एकरूप यामधून स्पष्ट होते.

जीवन चरित्र

परळी वैजनाथ येथील जगमित्र नागा, एक निरागस वृत्तीचे निःस्पृह स्वभावाचे म्हणून त्यांचा समाजात परिचय होता. भीमस्वामी व रामदासी या चरित्रकारांनी जगमित्र नागांचे विस्ताराने चरित्र लिहिले आहे. ते म्हणतात,

“जगमैत्र नागा ऐका कथा त्याची।
मैत्री ज्याची साची भूत मात्री।”

यामध्ये नागांच्या स्वभावाचा परिचय करून दिला आहे. काही चरित्रकारांनी । नागांविषयी म्हणले आहे, ‘जगमित्र राहे प्रतिष्ठानी। द्रव्याचा व्यवसाय करूनि । ते एक श्रीमंत गृहस्थ होते, लक्ष्मीपुत्र म्हणूनही त्यांचा लौकिक होता. काळाच्या प्रवाहात त्यांची मोठी संपत्ती अचानक नष्ट झाली, असे म्हणतात आणि ते गरीब श्रीमंती गेली आणि दारिद्र्य आले. श्रीमंतीच्या राजगादीवरून एकाएकी झाले. रस्त्यावर आले. द्रव्य गेल्यावर पत कशी राहणार, संकटसमयी तिही निघून गेली. त्यांच्या जिवाभावाचे मित्र होते, तेही निघून गेले, धनाच्या गादीवर लोळणाऱ्याला धुराळ्यात लोळण्याची पाळी आली. जगमित्र नागा देशोधडीस लागले, (महाराष्ट्र संत चरित्रमाला, ज० रा० आजगावकर)

संकटकाळी सर्वांना समाधान देणारे व चित्तास शांत करणारे असे जे ईश्वरभजन यात जगमित्र मग्न असत. ईश्वरी चिंतनात समाधान मिळविताना ‘नागा स्वामी नावाच्या सत्पुरुषाचा त्यांना संग मिळाला, त्यांच्या चरणी ते लीन झाले. त्यांच्या नावात एकरूप झाले. जगाचा मित्र असणारे जगमित्र नागा स्वामींच्या स्पर्शाने नागा झाला. त्यातून पुढे संत ‘जगमित्र नागा’ अशा नावाची त्यांच्यावर मोहर उमटली.

नागास्वामी नावाच्या सत्पुरुषाच्या सहवासाने आपल्या नावापुढे त्यांचे नाव कायम लावून घेतले. परंतु काही चरित्रकारांच्या मते जगमित्र किंवा जगमित्र हे उपनाव असून या जगमैत्राकडे पुणे जिल्ह्यातील मुठे खोऱ्यातील मौजे पिरंगुट येथील कुलकर्णी पद होते. अनेक शतके हे जगमित्राचे कुटुंब महाराष्ट्रात राहात होते. या जगमैत्राच्या घराण्यात शके १२८० (इ० स० १३५८) चे सुमारास पिरंगुटचे कुलकर्णी पद होते. शके १५०० नंतर रंगभट जगमैत्र यांनी हे आपले वतन कोणी बाळाजी हरी मेंडजोगी या गृहस्थास विकले. (महाराष्ट्र सारस्वत वि० ल० भावे, पृ० क्र० १४८)

जगमित्रांच्या चरित्रात दोन चमत्कार कथा संत नामदेवांनी ‘संतचरित्रे’ या सदरात सांगितलेल्या आहेत. संत नामदेवांनी जगमित्रांच्या जीवन काळातील या कथा सांगितल्या आहेत. कथा विठ्ठल आणि त्यांचे भक्त यांच्याविषयी आहेत. केवळ रोजचे चिंतन, नामस्मरण, कीर्तन व भजन करीत असताना समाजातील । वेगवेगळ्या घटकांच्या सहवासात जगता वागताना भक्तांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते.

संकटकाळी भक्ताच्या पाठीमागे विठ्ठल उभा असतो. इतकेच या चमत्कार कथांमधून आपणास समजते.

व्यक्तिमत्त्व

नामदेव समकालीन संत करवींमध्ये जगमित्र नागांचे व्यक्तिमत्त्व संतांच्या सहवासानून मत्ताच्या समवेत घडलेले दिसते. पंढरपूर निवास असणाऱ्या संतांचा , भरीवि्गलाच्या वर्शनासाठी सर्व संतांच्या समवेत केलेली आषाढी-कार्तिकी पारी, चंद्रभागेच्या वाळवंटी कीर्तन प्रवचनात पारमार्थिक आनंद, अनेकदा नामदेवाच्या मांदियाळीत संगत सोबत केलेल्या तीर्थयात्रा. या सर्वांचा वैचारिक व पारमाधिक प्रभाव सर्व संतांच्या भावभक्तीवर झालेला आहे. या धार्मिक आणि वैचारिक संस्कारांतून सर्व संतांचे व्यक्तिमत्त्व भक्तिमय असे तयार झालेले आहे. त्यांचे दैनंदिन जीवन भावभक्तीने केलेले हरिचिंतन. सर्व संतांच्या मांदियाळीतील जात-धर्म बाजूला ठेवून सात्विक भावाने एकत्र येणे. या सर्व गोष्टींचा प्रभावी पगडा जगमित्र नागा यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडलेला दिसतो.

वाची त्यांच्या कोणताही, व्यवसाय उद्योग न करता समाजासमवेत राहून निःस्पृह निःसंग भावाने ते परळी वैजनाथ येथे राहात होते. मंदिरामध्ये देवदर्शनाला येऊन समाजाशी कीर्तनाच्या माध्यमातून संवाद करणे, लोकमानसाशी भक्तिभावाने बागणे. निरासक्त भावनेने समाजाच्या सहवासात राहणे. मनामधे कोणताही हेतू न ठेवता भक्तिभावाच्या व्यासपीठावर समतेची वैचारिक बैठक निर्माण करणे. या गोष्टी जगमित्र करीत असे. गावात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे ईश्वरचिंतन करणे, उत्पन्नाचे साधन म्हणून गावाने दिलेली जमीन नाकारणे, केवढे मोठे निःस्वार्थ साधुत्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. त्या जमिनीतील गावकऱ्यांनी काढलेल्या उत्पन्नाचा भाग प्रेमाने नाकारणे, ते उत्पन्न गरीब लोकांना वाटणे, दानधर्म करणे, हा त्याग संतच करू शकतात.

संत नामदेवांचा त्यांना लाभलेल्या सहवासात त्यांनी स्वतःच्या आत्मोन्नतीचा मार्ग शोधला होता, श्रीज्ञानदेव नामदेवांचे भावविश्व, ईश्वरभक्ती, भावनिक तळमळ, आध्यात्मिक तळमळ, नामस्मरण चिंतन, परमत सहिष्णुता यासारख्या अनेक गोष्टी जगमित्र नागांनी अतिशय जवळून ऐकल्या, पाहिल्या, अनुभवल्या आहेत. त्यामुळे विठ्ठलाबद्दलची अंतःकरणातून असणारी भावभक्तीची ओढ ते सांगतात,

“हरिजागरासी जावे। माझ्या विठोबासी पाहावे ॥
देव ऋषी सवे येतो। नभी विमाने दाटती॥
काकड आरती दृष्टी पडे। उठाउठी पाप झडे॥
ऐसा आनंद सोहळा। जगमित्र नागा पाहे डोळा ॥

विठोबाच्या दर्शनाची मनस्वी लागलेली ओढ ते व्यक्त करतात. निर्माण आणि। अतीव भक्तिभाव त्यांनी वरील अभंगात व्यक्त केला आहे. श्रीविठ्ठल हे अवघ्या वारकरी संप्रदायाचे अराध्य दैवत आहे. त्याच्या दर्शनाची आत्यंतिक ओढ लागलेली आहे.

त्याचा उत्कट भक्तिभाव व त्याचा प्रत्यय त्यांच्या शब्दरूपातून व्यक्त होतो. सर्वानि विठ्ठलमय होऊन जातात. त्यांच्या अनुभवाच्या सर्व पातळीवर कवळ विठ्ठलच भरून राहिला आहे.

संकटविमोचक विठ्ठलाचा

संत नामदेवांच्या समकालीन किंवा परिवारातील सर्व संत अंतर्बाव विठ्ठलाचे परमभक्त होते. विठ्ठलभक्तीचा छंद त्यांच्या जीवनाचा गाभा होता. आत्मानुभूतीतून पांडुरंगाचा साक्षात्कार हा त्यांच्या जीवनाचा परमानंद होता परंतु या अतिउच्च अशा परमानंदातसुद्धा संत जगाला कधी विसरलेले नाहीत. आपआपल्या परीने विश्वदर्शन घ्यावे. ही त्यांची भावना होती.

संत नामदेवांनी श्रीसकलसंतगाथेत ‘संत चरित्रे’ लिहिली ती अतिशय रसपूर्ण आहेत. नामदेवकृत अनेक संतांची चरित्रे वेगळ्या पद्धतीने लिहिली आहेत. चरित्रातील वर्णन अतिशय सूक्ष्म अवलोकनाचा परिपाक आहे. त्या चरित्रामागरची भूमिका ही अत्यंत साक्षेपी आहे. संतांबद्दल आपल्या भावनांचा आविष्कार नामदेव अतिशय प्रेमळपणाने करतात. अशी चरित्रे एक उपयुक्त असा ऐतिहासिक दस्तऐवज होऊ शकतो.

संतनामदेवकृत अभंगात संत जगमित्र नागा यांच्याविषयी (श्रीनामदेवाचे अ० क्र० २३३८) संत चरित्रं लिहिले आहे. ते जगमित्रांच्या आयुष्यातील दोन चमत्कार कथा कथन केल्या आहेत. संत लौकिक जीवन जगत असताना समाजातील प्रत्येक घटक स्नेहभावाने प्रेमभराने वागेल, असे सांगता येत नाही, कुठे तरी सतत शत्रू- मित्र भेटत असतात, काही प्रेमळपणाने आदर करतात, काही मत्सरात शत्रुत्त्व घेतात. पण संतांना अनेकदा शत्रुत्व आणि मित्रत्व यांच्या पुढे जायचे असते. अशा वेळी अनेकदा संकटाला सामोरे जावे लागते.

जगमित्र नागा, हे सर्व गावाचे मित्र, पण तेथेसुद्धा त्यांचा मत्सर करणारे, आसपास लोक होतेच. नित्याचे कर्म संपवून घरातील कुटूंबीय झोपी गेल्यावर, खलवृत्तीच्या लोकांनी घर जाळले. हा प्रसंग उद्भवल्यावर, ईश्वराला आळवले, नंतर ईश्वराचा धावा केला. भावभक्तीच्या बळावर

“पांडव राखिले लाक्षांतून जोहरी। तैसी करी परी नामयासी।”

अग्नीज्वाळेने घर जळाले; कुटुंबीय वाचले

“ऐकोनिया स्तुति आले नारायण। शांत झाला अग्नि तेचि वेळा॥”

भक्ताचे संकट निवारण्याचे काम प्रत्यक्ष परमात्मा करतो. संकटसमयी भक्ताच्या पाठीमागे तो उभा राहतो.

गावाने जगमित्राला जमिनीचा दिलेला तुकडा बादशहाचा सुभेदार खालसा करतो, नाही तर माझ्या घरी विवाहासाठी जिवंत वाघ आणून दे. असा बादशहाच्या सुभेदाराने जगमित्र नागांना उभा दम दिला. जगमित्र विठ्ठलाचा धावा करू लागले. विठ्ठलाच्या रूपाने वाघ वेशीचा दरवाजा उघडून सुभेदाराच्या घरी अवतरला. वाघाच्या डरकाळीने अवघे गाव थरारले. सुभेदाराच्या स्त्रीने जगमित्र ंची माफी मागावयास सागितली. जगमित्रांनी दया दाखविली. यांसारख्या प्रसंगामधून भक्तांच्या संकटांना त्वरित सामोरे जाऊन संकट निवारण्याचे काम प्रत्यक्ष परब्रह्म करतो, याची प्रचीती प्रत्येक भगवंतभक्ताला असते. भक्ताच्या संकटसमयी विठ्ठल त्वरित धावत जातो.

अभंगरचना

संत नामदेव समकालीन संत जगमित्र नागा यांच्या नावे श्रीसकलसंतगाथेत (नामदेवाची अभंगगाथा) एकूण सात अभंग आहेत. तसेच महाराष्ट्र कविचरित्र माला (ज० रा० आजगावकर) या ग्रंथात एकूण १२ अभंग आहेत. नामदेवांनी आपल्या ‘संतचरित्रे’ या सदरात जगमित्र नागा या विषयी १२६ चरणांचा प्रदीर्घ असा चरित्रात्मक अभंग रचलेला आहे. जगमित्र नागांचे अभंग कोणी लिहिले याचा कोठेही उल्लेख सापडत नाही. त्यांच्या अभंगरचनेवरून त्यांच्या अजून काही भागात रचना असाव्यात; पण प्रत्यक्षात त्या कोठेही सापडत नाहीत. काळाच्या ओघात त्या पडद्याआड गेलेल्या असाव्यात. कारण आज जे उपलब्ध अभंग आहेत ते केवळ विठ्ठलाच्या स्वरूपाविषयीचे आहेत, तसेच श्रीविठ्ठल व श्रीरुक्मिणी देवीच्या भक्तीपर स्वरूपाचे आहेत. ते पाठांतरातून पिढ्यान्पिढ्या पुढे आले आहेत.

अभंगांचे विषय

जगमित्र नागाकृत फक्त बारा अभंग उपलब्ध आहेत. त्यामध्ये विठ्ठलाविषयी तीन अभंग व विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीविषयी नऊ अभंग आहेत. या दोन्ही प्रकारच्या विषयांमधून जगमित्र नागा यांचे पारमार्थिक व्यक्तिमत्त्व उठून दिसते. ईश्वरचिंतनात त्यांची भक्तिभाववृत्ती एकरूप झालेली दिसते. समकालीन संतांच्या सांगाती, संतसंग व नामस्मरणाने त्यांची चित्तवृत्ती विशुद्ध झालेली दिसते. पंढरीच्या विठ्ठलाच्या सान्निध्यात जे सुख प्राप्त होते, त्याची कशाशीही तुलना होणार नाही. त्यांच्या नामघोषाने घराघरातील वातावरण केवळ पवित्र होणार नाही, तर स्त्रीपुरुषांच्या हृदयात अद्वैतातून विठ्ठलनामाचा गजर होत राहील, इतकेच काय,

“विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे। जन्म सार्थक जाहले साचे ॥
या सार्थकापोटी नागा। जगमित्रा आनंद नागा पोटी॥”

ज्या ठिकाणी विठ्ठलसमचरणी उभा आहे, तेथे अशी विस्मयकारक समाधानाची भावना व्यक्त करतात. विठ्ठलाचे नाममुखाने घेता घेता, जन्माचे खऱ्या अथनि सार्थक झाले. नागा समाधानाची, आनंदाची भावना कृतार्थतने व्यक्त करतात.

श्रीरुक्मिणीदेवींविषयी जगमित्राच्या अंतःकरणात असणारा भक्तिभात अलौकिक आहे. रुक्मिणीविषयी व्यापक असा भक्तिभाव व उपासनेतून परमार्थपरता याचा अपूर्व समन्वय नागांच्या खालील अभंगातून दिसतो. सहजसुंदर चरणरचना, अचूक व नेमक्या शब्दांमध्ये रेखाटलेले शब्दचित्र वाचनीय ठरते.

“आई बहु कृपावंत। विश्वजनासी पोषीत॥
रुक्मादेवीस भजती। मनोरथ त्याचे पूर्ण होती।
दिव्य वस्त्र कुंकूम ल्याली। रत्न भरणे ती शोभली ॥
रुक्मादेवी वराच्या चरणी। जगमित्र नागा लोटांगणी ॥ “

(जगमित्र नागा, अ० क्र०८)

देवीच्या भक्तिभावापोटी तिचे अतिशय सुरेख व अतीव देखणे सुवर्णालंकार- जडित सजविलेल्या एखाद्या रूपवान मूर्तीचं वर्णन वरील अभंगात केवळ अतुलनीय श्रद्धा-भक्तीचा आविष्कार म्हणून केलेले आहे, असे नसून, ईश्वरभक्ती किती सखोल स्पर्शिली आहे याचा हा प्रत्यय देणारे वर्णन आहे. रुक्मिणीदेवीची भक्तिभावाने पूजा केल्यास मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतात, अशी नागांची भक्तिभावना होती.

नागांचा अद्वैतभाव

वारकरी संप्रदायाला केवळ अद्वैताचे अधिष्ठान लाभल्याने स्त्री-पुरुष, उच्चनीच जाती, भेदाभेद या गोष्टींना भक्तिपंथात कसलेही स्थान नाही. श्रीज्ञानदेव- नामदेवांच्या ध्यानीमनी समाजातील सर्व घटक एकाच पायरीवरचे समान पातळीवर आहेत. म्हणूनच त्यांनी जातिपातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाज एकात्मतेच्या वैचारिक पातळीवर आणला. या विचाराचा सखोल प्रभाव जगमित्रांच्या अभंगांवर झालेला आहे. ईश्वरी चिंतनातून, नामस्मरण करताना ते म्हणतात, “ईश्वरीकृपेने हा मिळालेला नरदेह त्याचे सार्थक करावयाचे असेल, तर

एकमेव मार्ग विठ्ठलाची मनोमन उपासना करावी. कारण नरदेह (मनुष्यजन्म)। रिजालेला आहे, तो देह ईश्वरार्पण बुद्धीने घालवावा. त्याच्या भक्तीत घालवावा.” ” भक्ती देवाची करावी। भेदवृष्टी सोडावी॥’ या जन्मात आला तर एकच करा भेदाभेत भ्रम अमंगळ’ आहेत येथे तुकोबांच्या उक्तीची आठवण येते. कारण ‘आत्मा आहे. तो भूतात। भूते आहे ती आत्म्यांत॥’ हा वैश्विक सत्याचा सिद्धान्त अगामेतानी सहजपणे सांगितला आहे. आपण सारे एक आहोत, जसे गाई अनेक रंगाच्या असतात, पण त्याचे दूध मात्र पांढरे शुभ्र असते किंवा कोणत्याही जातीत जन्माला आलेल्या माणसाचे रक्त हे तांबडेच असते. प्रत्येकाच्या हृदयात आत्मा सर्वांचा सारखाच आहे. प्रत्येक आत्मा हृदयात आहे. ये हृदयीचे ते हृदयी एकच आहोत, हा अद्वैती भाव जगमित्र नागांनी सहजपणे, साध्या सोप्या भाषेत हुजनांना समजेल अशा शब्दांमध्ये व्यक्त केला आहे

वाङ्मयीन वैशिष्ट्ये

जगमित्रांची कविता अतिशय प्रासादिक साधी, सोपी व सहज सुंदर आहे. विठ्ठलभक्तीचे स्वरूप सांगताना विठ्ठलाचे वर्णन अल्पाक्षरातून करताना सहज भक्तिभाव व्यक्त होतो. त्यांनी भक्त पुंडलिकांच्या भावभक्तीचा नामनिर्देश केला आहे.

“भक्तीसाठी रूपे धरी। त्याचे काम अंग करी ॥
आला पुंडलिकासाठी। अकस्मात जगजेठी ॥
अनंत ब्रह्मांडे रचिली। नाना परी क्रीडा केली।॥
हे तव न कळे कोणासी। जगमित्र नागा ध्यास मानसी॥

(जगमित्र नागा, अ० क्र०१)

मक्ताने ईश्वरभेटीचा ध्यास घेतल्यास ईश्वर भक्तास विविध रूपामध्ये वेशामध्ये भेटत असतो. विठ्ठल भेटीसाठी अनिवार इच्छा असणे, ही भक्ताची कसोटी आहे. जगमित्राच्या दृष्टीने विठ्ठल, कृष्ण, विष्णू यासारख्या रूपात भक्तांना भेटला आहे, जसा पुंडलिकासाठी अचानक विठ्ठल भेटला. तो मला सुद्धा भेटावा हा मनामध्ये ध्यास घेतला आहे. यासारख्या अभंगरचनेतून ईश्वरभेटीचा भाव अतिशय साध्या पण उत्कट शब्दांमधून व्यक्त केला आहे. ईश्वर सर्वाठायी भरून उरलेला आहे; पण तो वेगवेगळ्या रूपात असतो.

जगमित्रांनी विठ्ठलाची पूजा मांडली आहे. त्या वेळी पूजेचे वर्णन सुंदर आणि मनोहारी शब्दांमध्ये केले आहे. पूजा बांधताना पूजा समोर करीत आहे, ती आपल्या नजरेसमोर आहे, मंदिराच्या गाभाऱ्यात चाललेल्या भक्तिपूर्ण पूजेचे हुबहूब वर्णन जगमित्रांनी केले आहे, एखाद्या स्वभावोक्ती अलंकाराचे सुंदर उदाहरण

आहे. महाप्रसाद ताटीचा, विडा आपुले हातीचा, चुवा चंदन केसरीचा, झगा (वस्त्र) आपुलेअंगीचा, तीर्थ चरणीचे शितल, कंठीची तुळसीमाळ, ही सर्व विठ्ठलाच्या पूजेसाठी केलेली तयारी आहे. पवित्र मंदिरात होत असलेल्या पूजेच्या वेळी असलेल्या पूजासाहित्याच्या सामग्रीच्या मांडणीतून होणारा भक्तीचा आविष्कार, एक नितांत सुंदर तन्मयतेने पूजा बांधणीचे स्वरूप या ठिकाणी त्यांनी वर्णिले आहे. ही एक भक्तीतील समर्पता, स्वरूपता व एकरूपता अभंगरचनेतून दिसते.

जगमित्रांचे बहुतेक अभंग हे आठ चरणी आहेत. सर्व चरणांमध्ये अल्पाक्षरी रचना असून प्रत्येक दोन चरणांच्या शेवटी अंत्ययमक वापरलेले दिसते. त्यामळे अभंगाच्या अर्थाला समजण्यास सहजपणा येतो व अभंगातील आशय प्रवाही व सोपा वाटतो. अभंगातील अवघड, अनाकलनीय, कठीण विषय, तत्त्व अकलनीय होऊन जाते, समजण्याच्या पातळीवर येते.

“सकळ भूषणांचे भूषण। कंठी धरा नारायण ॥
तेणे तुटती यातना। चुकती यमाच्या पतना॥
शिव मस्तकी धरिला। भेद भक्तांचा काढिला॥
अवघ्या देवांचे हे ध्यान। जगमित्र नागा वंदी चरण।”

(जगमित्र नागा, अ० क्र०६) यमाचे फेरे केव्हा चुकतील तर सर्व देवांचा देव परमात्मा याचे सदैव चिंतन होईल तेव्हा, अतिशय सहजपणे महत्त्वाचे तत्त्वज्ञान, किंवा वारकरी संप्रदायाचे भक्तीचे तत्त्व जगमित्राने सांगितले आहे, ते जनसामान्यांना त्वरित समजेल अशा शब्दांमध्ये सांगितले आहे.

देव ही संकल्पना अतिशय व्यापक सर्वाभूती आहे. ती तत्त्वरूपाने पूर्णतः कळेल, असा अभंगरचनेमागील नागांचा हेतू आहे.

संतकाव्यात भक्ती हा त्यांचा स्थायिभाव आहे. हृदयातळी असलेली ईश्वरा- विषयी तळमळ व्यक्त करायला जरी कवी निघाला असला, तरी ही तळमळ केवळ त्याच्यामध्ये असणाऱ्या भक्तीचे फळ होय. भक्तीमुळे त्यांच्या मनातील शोकादी भावना सहज उसळल्या तरी त्या विशिष्ट प्रमाणात असतात, कारण प्रथम ते संत असतात. एक साधे निर्मळ मन संतांचे असते. अशा निर्मळ मनाच्या जगमित्रांनी जीवन हे सार्थकी लावायचे असेल, ईश्वरार्पण बुद्धीने जगायचे सुख किंवा असेल, तर मुखाने “विठ्ठल विठ्ठल” हा महामंत्र नामस्मरणाच्या स्वरूपाने म्हणत राहावा. मगच दुःखापासून मुक्ती मिळेल, सतत ईश्वरी सान्निध्य मिळेल, अशी अपेक्षा ते धरतात.

संत नामदेव समकालीन संतांवर त्यांच्या भक्तिकार्याचा, आध्यात्मिक विचारांचा त्यांच्या अभंगवाणीतील रचनेचा, तीर्थयात्रेतील अनुभवाचा, पारमार्थिक এनुभूतीचा खूप मोठा प्रभाव पडलेला दिसतो. नामदेवांच्या नामसंकीर्तनात, रनिक्षाच्या मांदियाळेतील एकात्मतेत विविध जाती-जमातींचे संत होते. काही श्रेष्ठ अनुभवी होते, तर काही संगतीत राहणारे भजनकरी होते; पण ते । चारिक भूमिकेतून अनुभवी होते, एकूणच जममित्र नागांच्या बाबतीत ते समकालिनांमध्ये लहान संत होते. आपल्या भूक्तिभावाजून विठ्ठुलसुखाचा संत- নइवासाचा सीहळा अनुभवीत होते.

जगमित्र नागांच्या काही अभंगरचना किठुलभंक उत्कटतेचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. साध्या साध्या शब्दांमध्ये विठ्ठेल पूरजी माडलेली आहे. ही डण्याची चित्रशैली भक्तिभावनेला आकर्षित करणारी आहे. विठ्ठलाविषयी त्यांच्या मनाला केवळ ओढ लागली नाही तर विठ्ठलाशी माझी भेट होत नाही तर त्याला भेटावयाचे आहे असा निरोप द्या, अशी मागणी करीत आहेत.

तीर्थ चरणीचे शीतल। आणि कंठीची तुळशी माळ ।
विनवी जगमित्र नागा। जाऊनी विठोबाला सांगा॥”

ते विठ्ठलाच्या भेटीची निग्रहाने मागणी करतात. विठ्ठल कसा आहे, त्याने कोणते अलंकार परिधान केले आहेत, याचे हुबेहूब दर्शन नागा घडविताना दिसतात. विठ्ठलाच्या दर्शनाचे स्मरण, हे विठ्ठलावर असणाऱ्या अपरंपार प्रेमाचा सुंदर आविष्कार या रचनेतून पहावयास मिळतो.

काही अभंगात प्रत्येक चरणामध्ये शब्दांची पुनरुक्ती केल्याने, तो अभंग केवळ सहज सोपा वाटत नाही, तर वर्णनातील चित्रमयता, सूक्ष्मता, आस्वाद्य शब्द योजना असल्याने, अधिकच भावतो. जगमित्र म्हणतात,

“अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥
अग्नि जाळी तरी न जळती गोपाळू। हृदयी देवकीबाळू म्हणोनिया॥
अग्नि जाळी तरी न जळती पांडव। हृदयी वासुदेव म्हणोनिया।
अग्नि जाळी तरी न जळे बिभिषणाचे घर। हृदयी सीतावर म्हणोनिया।”

(जगमित्र नागा, अ० क्र० १२)

नागाने वारंवार पण सहज सुंदर शब्दांमध्ये, भक्त प्रल्हाद, श्रीकृष्ण, पांडव, विभीषण, नागा यांची उदाहरणे देऊन भक्ताचे रक्षण करणाऱ्या परमात्म्यांची नावे । घेतली आहेत. यावरून जगमित्रांची रचनाशैली, कविता अतिशय प्रसन्न व प्रासादिक वाटते. ही चित्रशैली भक्तिभाव समृद्ध व मन पवित्र करणारी वाटते.

श्रोत :- santsahitya.in

नवीन माहिती