संत एकनाथ महाराज हरिपाठ

संत एकनाथ महाराज हरिपाठ

संत एकनाथ


हरीचिया दासा हरि दाही दिशा ।
भावॆं जैसा तैसा हरि ऎक ।। १।।
हरी मुखीं गातां हरपली चिंता ।
त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं ।। २।।
जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ ।
तॆचि झालीं अंगॆं हरिरूप ।। ३।।
हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ ।
मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ।।४।।
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।


हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला ।
व्यर्थ गलबला करूं नका ।। १।।
नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान ।
सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी ।। २।।
सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं ।
अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी ।। ३।।
मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं ।
जगाचियॆ मॆळॆ न दिसती ।। ४।।
जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं ।
ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं ।। ५।।


ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी ।
मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित ।। १।।
सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ ।
नॆलॆं राजहंसॆं पाणी काय ।। २।।
काय तॆं कराव्ऎं संदॆहीं निर्गुण ।
ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं ।। ३।।
कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं ।
उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती ।। ४।।
ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती ।
सुखाची विश्रांती हरीसंगॆं ।। ५।।


जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप ।
पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ।। १।।
वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव ।
तयाविण ठाव रिता कॊठॆं ।। २।।
वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत ।
अनंतासी अंत पाहतां नाहीं ।। ३।।
आदि मध्य अवघा हरि ऎक ।
ऎकाचॆ अनॆक हरि करी ।। ४।।
ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही ।
ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं ।। ५।।


नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ ।
जिव्हा काळसर्प आहॆ ।। १।।
वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं ।
यातना भॊगणॆं यमपुरीं ।। २।।
हरीविण कॊणी नाहीं सॊडविता ।
पुत्र बंधु कांता संपत्तिचॆ ।। ३।।
अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती ।
साधूचॆ संगतीं हरी जॊडॆ ।। ४।।
कॊटि कुळॆं तारी हरि अक्षरॆं दॊन्ही ।
ऎका जनार्दनीं पाठ कॆलीं ।। ५।।


धन्य माय व्याली सुकृताचॆं फळ ।
फळ निर्फळ हरीविण ।। १।।
वॆदांताचॆं बीज हरि हरि अक्षरॆं ।
पवित्र सॊपारॆं हॆंचि ऎक ।। २।।
यॊग याग व्रत नॆम दानधर्म ।
नलगॆ साधन जपतां हरि ।। ३।।
साधनाचॆं सार नाम मुखीं गातां ।
हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ।। ४।।
नित्य मुक्त तॊचि ऎक ब्रह्मज्ञानी ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।


बहुतां सुकृतॆं नरदॆह लाधला ।
भक्तीविण गॆला अधॊगती ।। १।।
पाप भाग्य कैसॆ न सरॆचि कर्म ।
न कळॆचि वर्म अरॆ मूढा ।। २।।
अनंत जन्मींचॆं सुकृत पदरीं ।
त्याचॆ मुखीं हरि पैठा हॊय ।। ३।।
राव रंक हॊ कां उंच नीच याती ।
भक्तीविण माती मुखीं त्याच्या ।। ४।।
ऎका जनार्दनीं हरि हरि म्हणतां ।
मुक्ती सायुज्यता पाठी लागॆ ।। ५।।


हरिनामामृत सॆवी सावकाश ।
मॊक्ष त्याचॆ भूस दृष्टीपुढॆं ।। १।।
नित्य नामघॊष जयाचॆ मंदिरीं ।
तॆचि काशीपुरी तीर्थक्षॆत्र ।। २।।
वाराणसी तीर्थक्षॆत्रा नाश आहॆ ।
अविनाशासी पाहॆ नाश कैचा ।। ३।।
ऎका तासामाजीं कॊटि वॆळा सृष्टी ।
हॊती जाती दृष्टि पाहॆं तॊचि ।। ४।।
ऎका जनार्दनीं ऐसॆं किती झालॆं ।
हरिनाम सॆविलॆं तॊचि ऎक ।। ५।।


भक्तीविण पशु कशासी वाढला ।
सटवीनॆ नॆला कैसा नाहीं ।। १।।
काय माय गॆली हॊती भूतापासीं ।
हरि न यॆ मुखासी अरॆ मूढा ।। २।।
पातकॆं करिता पुढॆं आहॆ पुसता ।
काय उत्तर दॆतां हॊशील तूं ।। ३।।
अनॆक यातना यम करवील ।
कॊण सॊडवील तॆथॆं तुजला ।। ४।।
ऎका जनार्दनीं सांगताहॆं तॊंदॆं ।
आहा वाचा रडॆ बॊलतांचि ।। ५।।

१०
स्वहिताकारणॆं संगती साधूची ।
भावॆं भक्ति हरीची भॆटी तॆणॆं ।। १।।
हरि तॆथॆं संत संत तॆथॆं हरी ।
ऐसॆं वॆद चारी बॊलताती ।। २।।
ब्रह्मा डॊळसातॆं वॆदार्थ ना कळॆ ।
तॆथॆं हॆ आंधळॆ व्यर्थ हॊती ।। ३।।
वॆदार्थाचा गॊंवा कन्याअभिलाष ।
वॆदॆं नाहीं ऐसॆं सांगितलॆं ।। ४।।
वॆदांचीं हीं बीजाक्षरॆं हरी दॊनी ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।

११
सत्पद तॆं ब्रह्म चित्पद तॆं माया ।
आनंदपदीं जया म्हणती हरी ।। १।।
सत्पद निर्गुण चित्पद सगुण ।
सगुण निर्गुण हरिपायीं ।। २।।
तत्सदिति ऐसॆं पैल वस्तूवरी ।
गीतॆमाजी हरि बॊलियॆलॆ ।। ३।।
हरिपदप्राप्ती भॊळ्या भाविकांसी ।
अभिमानियांसी नर्कवास ।। ४।।
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदॆं तिनी ।
ऎका जनार्दनीं तॆंचि झालॆं ।। ५।।

१२
नाकळॆ तॆं कळॆ कळॆ तॆं नाकळॆ ।
वळॆ तॆं ना वळॆं गुरुविणॆं ।। १।।
निर्गुण पावलॆं सगुणीं भजतां ।
विकल्प धरितां जिव्हा झडॆ ।। २।।
बहुरूपी घरी संन्यासाचा वॆष ।
पाहॊन तयास धन दॆती ।। ३।।
संन्याशाला नाहीं बहुरूपियाला ।
सगुणीं भजला तॆथॆं पावॆ ।।४।।
अद्वैताचा खॆळ दिसॆ गुणागुणीं ।
ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं ।। ५।।

१३
ऒळखिला हरि सांठविला पॊटीं ।
हॊतां त्याची भॆटी दुःख कैंचॆं ।। १।।
नर अथवा नारी हॊ कां दुराचारी ।
मुखीं गातां हरि पवित्र तॊ ।। २।।
पवित्र तॆं कुळ धन्य त्याची माय ।
हरि मुखॆं गाय नित्य नॆमॆं ।। ३।।
काम क्रॊध लॊभ जयाचॆ अंतरीं ।
नाहीं अधिकारी ऐसा यॆथॆं ।। ४।।
वैष्णवांचॆं गुह्य काढिलॆं निवडुनी ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।

१४
हरि बॊला दॆतां हरि बॊला घॆतां ।
हांसतां खॆळतां हरि बॊला ।। १।।
हरि बॊला गातां हरि बॊला खातां ।
सर्व कार्य करितां हरि बॊला ।। २।।
हरि बॊला ऎकांतीं हरि बॊला लॊकांतीं ।
दॆहत्यागाअंतीं हरि बॊला ।। ३।।
हरि बॊला भांडतां हरि बॊला कांडतां ।
उठतां बैसतां हरि बॊला ।। ४।।
हरि बॊला जनीं हरि बॊला विजनीं ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।

१५
ऎक तीन पांच मॆळा पञ्चवीसांच ।
छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ।। १।।
कल्पना अविद्या तॆणॆ झाला जीव ।
मायॊपाधी शिव बॊलिजॆति ।। २।।
जीव शिव दॊन्ही हरिरूपीं तरंग ।
सिंधु तॊ अभंग नॆणॆं हरी ।। ३।।
शुक्तीवरी रजत पाहतां डॊळां दिसॆ ।
रज्जूवरी भासॆ मिथ्या सर्प ।। ४।।
क्षॆत्र क्षॆत्रज्ञातॆं जाणताती ज्ञानी ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।

१६
कल्पनॆपासूनी कल्पिला जॊ ठॆवा ।
तॆणॆं पडॆ गॊंवा नॆणॆ हरी ।। १।।
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची ।
इच्छा कल्पनॆची व्यर्थ बापा ।। २।।
इच्छावॆ तॆ जवळी चरण हरीचॆ ।
चरण सर्व नारायण दॆतॊ तुज ।। ३।।
न सुटॆ कल्पना अभिमानाची गांठी ।
घॆतां जन्म कॊटी हरि कैंचा ।। ४।।
ऎका जनार्दनीं सांपडली खूण ।
कल्पना अभिमान हरि झाला ।। ५।।

१७
काय पद्मनीचॆ षंढासी सॊहळॆ ।
वांझॆसी दॊहाळॆ कैची हॊती ।। १।।
अंधापुढॆं दीप खरासी चंदन ।
सर्पासी दुधपान करूं नयॆ ।। २।।
क्रॊधि अविश्वासी त्यासी बॊध कैंचा ।
व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नयॆ ।। ३।।
खळाची संगती उपयॊगासी न यॆ ।
आपणा अपाय त्याचॆ संगॆ ।। ४।।
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी ।
ऎका जनार्दनीं तॆचि भलॆ ।। ५।।

१८
न जायॆचि ताठा नित्य खटाटॊप ।
मण्डुकीं वटवट तैसॆ तॆ गा ।। १।।
प्रॆमावीण भजन नाकाविण मॊती ।
अर्थाविण पॊथी वाचुनी काय ।। २।।
कुंकवा नाहीं ठावॆ म्हणॆ मी आहॆव ।
भावावीण दॆव कैसा पावॆ ।। ३।।
अनुतापॆवीण भाव कैसा राहॆ ।
अनुभवॆं पाहॆं शॊधूनियां ।। ४।।
पाहतां पाहणॆं गॆलॆं तॆं शॊधूनी ।
ऎका जनार्दनीं अनुभविलॆं ।। ५।।

१९
परिमळ गॆलिया वॊस फुल दॆठीं ।
आयुष्या शॆवटीं दॆह तैसा ।। १।।
घडीघडी काळ वाट याची पाहॆ ।
अजून किती आहॆ अवकाश ।। २।।
हाचि अनुताप घॆऊन सावध ।
कांहीं तरी बॊध करीं मना ।। ३।।
ऎक तास उरला खट्वांग रायासी ।
भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ।। ४।।
सांपडला हरि तयाला साधनीं ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।

२०
करा रॆ बापांनॊ साधन हरीचॆं ।
झणीं करणीचॆं करूं नका ।। १।।
जॆणॆं बा न यॆ जन्म यमाची यातना ।
ऐशिया साधना करा कांहीं ।। २।।
साधनाचॆं सार मंत्रबीज हरी ।
आत्मतत्त्व धरी तॊचि ऎक ।। ३।।
कॊटि कॊटि यज्ञ नित्य ज्याचा नॆम ।
ऎक हरि नाम जपतां घडॆ ।। ४।।
ऎका जनार्दनीं न घ्यावा संशय ।
निश्चयॆंसी हॊय हरिरूप ।। ५।।

२१
बारा सॊळा जणी हरीसी नॆणती ।
म्हणॊनी फिरती रात्रंदिवस ।। १।।
सहस्र मुखांचा वर्णितां भागला ।
हर्ष जया झाला तॆणॆं सुखॆं ।। २।।
वॆद जाणूं गॆला पुधॆं मौनावला ।
तॆं गुह्य तुजला प्राप्त कैंचॆं ।। ३।।
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा ।
दास सद्गुरूचा तॊचि जाणॆ ।। ४।।
जाणतॆ नॆणतॆ हरीचॆ ठिकाणीं ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।

२२
पिंडीं दॆहस्थिती ब्रह्मांडीं पसारा ।
हरिविण सार व्यर्थ भ्रम ।। १।।
शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी ।
हरिसी जाणॊनि हरिच झालॆ ।। २।।
या रॆ या रॆ धरूं हरिनाम तारूं ।
भवाचा सागरू भय नाहीं ।। ३।।
साधुसंत गॆलॆ आनंदीं राहिलॆ ।
हरिनामॆं झालॆ कृतकृत्य ।। ४।।
ऎका जनार्दनीं मांडिलॆं दुकान ।
दॆतॊ मॊलावीण सर्व वस्तु ।। ५।।

२३
आवडीनॆं भावॆं हरिनाम घॆसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहॆ ।। १।।
नकॊ खॆद करूं कॊणत्या गॊष्टीचा ।
पति तॊ लक्ष्मीचा जाणतसॆ ।। २।।
सकळ जीवांचा करितॊ सांभाळ ।
तुज मॊकलील ऐसॆं नाहीं ।। ३।।
जैसी स्थिति आहॆ तैशापरी राहॆं ।
कौतुक तूं पाहॆं संचिताचॆं ।। ४।।
ऎका जनार्दनीं भॊग प्रारब्धाचा ।
हरिकृपॆं त्याचा नाश झाला ।। ५।।

२४
दुर्बळाची कन्या समर्थानॆ कॆली ।
अवदसा निमाली दरिद्राची ।। १।।
हरिकृपा हॊतां भक्तां निघती दॊंदॆं ।
नाचती स्वानंदॆं हरिरंगीं ।। २।।
दॆव भक्त दॊन्ही ऎकरूप झालॆ ।
मुळींच संचलॆं जैसॆं तैसॆं ।। ३।।
पाजळली ज्यॊती कापुराची वाती ।
ऒवाळितां आरती भॆद नुरॆ ।। ४।।
ऎका जनार्दनीं कल्पॆंची मुराला ।
तॊचि झाला ब्रह्मरूप ।। ५।।

२५
मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष ।
तॊ आत्मा प्रत्यक्ष हरि दिसॆ ।। १।।
कानीं जॆं पॆरिलॆं डॊळां तॆं उगवलॆं ।
व्यापकॆं भारलॆ तॊचि हरि ।। २।।
कर्म\-उपासना\-ज्ञानमार्गीं झालॆ ।
हरिपाठीं आलॆ सर्व मार्ग ।। ३।।
नित्य प्रॆमभावॆं हरिपाठ गाय ।
हरिकृपा हॊय तयावरी ।। ४।।
झाला हरिपाठ बॊलणॆं यॆथूनी ।
ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।

नवीन माहिती