गजानन महाराज माहिती
शेगावीचा योगीराणा – गजानन महाराज (shri gajanan maharaj)
जन्म: ज्ञात नाही, माघ वद्य ७, १८७८ दिनांक २३-२-१८७८ रोजी शेगाव मध्ये प्रकट झाले,
आई/वडील: ज्ञात नाही
वेष: दिगंबर
कार्यकाळ: १८७८ ते १९१०
समाधी/निर्वाण: ऋषीपंचमी ८-९-१९१०, भाद्रपद शुक्ल पंचमी
चरित्र ग्रंथ: श्री गजानन विजय चरित्र ग्रंथ (लेखक: दासगणू महाराज )
गजानन महाराजांचे प्रकटीकरण – गजानन महाराज
वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी (gajanan maharaj) भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.
कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले. श्री गजानन महाराज (gajanan maharaj) हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.
श्रद्धात्मक इतिहास – गजानन महाराज
श्री गजानन महाराज (gajanan maharaj) हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने “आंध्रा योगुलु” नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे.
परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या “श्री गजानन महाराज चरित्र कोश” ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाने (लेखकाने शेगावात राहून आठ वर्षांच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले, असे समजते) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे.
इ.स. २००३ मध्ये ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाची १२९ वर्षे वय आहे असे सांगणार्या शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री भेट झाली, त्यावेळी सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी गजानन महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. शिवानंद सरस्वती हे तमिळनाडूमधील तिरुनेलवेल्लीहून आल्याचे लेखकाने लिहिले आहे. तसेच लेखकाने हेही स्पष्ट केले आहे की गजानन महाराज शेगावी प्रकट झाल्यानंतरही शिवानंद सरस्वती २५-३० वेळा त्यांना भेटावयास आले होते. अशा प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्रीयुत खापर्डे ह्यांच्या घरी राहत. शिवानंद सरस्वतींचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी “श्री गजानन विजय” ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे.
कालांतराने शिवानंद सरस्वती तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळ कोणासही दिसले नाहीत. हा सर्व तपशील ’गजानन महाराज चरित्र कोश’ या दासभार्गव-लिखित ग्र्ण्थात पृष्ठ ३६२-३६५ दरम्यान आला आहे. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. ते कोणीही असले तरी ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे, हे सत्य असावे.
माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी १८ वर्षाचे गजानन महाराज शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, “कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||”
बंकटलाल आगरवाल ह्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, “दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||.” जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत असे बंकटलालला वाटले आणि त्याने त्यांना स्वगृही आणले.
गजानन महाराज हे फार मोठे संत आहेत अशी भावना मनी धरणार्या भक्तांनी बंकटलालाचे घर दुमदुमून गेले. काही महिने गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून हटवून गावातील मारुतीच्या मंदिरात आणले.
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते. दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे. गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे.
स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरू असावेत असे काही लोकांचे म्हणणे असले तरी ते तसे नसावेत. कारण गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामी समर्थांप्रमाणेच पूर्ण अवताराची आहेत, तसेच श्री गजानन महाराज हे स्वयंभू होते. कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल मात्र श्री स्वामी समर्थ त्यांचे गुरू नक्कीच नव्हते.
हरीभाऊ (स्वामिसुत), नाना रेखी (नाना इनामदार), दादाबुवा महाराज या स्वामींच्या शिष्यांनी “श्री स्वामी समर्थ” या नाम मंत्राचा प्रचार केला, मात्र गजानन महाराजांनी कधीच “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा जप केला नाही. यावरून ते स्वामी समर्थांचे शिष्य नव्हते असेच म्हणावे लागेल.
स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका १८-१९ वर्षाच्या मुलास त्यांनी गणपती असे म्हटले आणि नंतर कपिलधारेला तपश्चर्या करण्यास पाठवले. जर ते गजानन महाराज होते असे गृहीत धरले तर १२ वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांचे वय ३० व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम प्रगट झाले तेंव्हा त्यांचे वय १८ वर्षेच होते. त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हटलेला मुलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते.
श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींचे मठ स्थापून त्यांचा त्या त्या प्रांतात प्रचार केला, स्वत: स्वामी मात्र सर्वत्र फिरत असतानादेखील कधीच स्वतःचा प्रचार करीत नव्हते. गजानन महाराजही उपाधींपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. सदैव सर्वत्र फिरत असले तरी त्यांनी स्वतःचा प्रचार कधीच केला नाही. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.
वर उल्लेखित केलेली काही मते स्वतंत्रपणे मांडून गजानन महाराज हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे शिष्यच नव्हते असे शाबीत करण्याचा बराच प्रयत्न झाला आहे. परंतु, एकाच गु्रूच्या प्रत्येक शिष्याचे कार्यस्थळ आणि उद्धाराचे कार्य हे दोन्ही वेगवेगळे असल्याकारणाने महाराजांनी स्वामींच्या नावाचा प्रसार केला नाही आणि म्हणून ते स्वामींचे शिष्य नाही ह्या पुराव्यात काहीही तथ्य नाही. खरे संत हे नाव आणि रूप ह्या सर्वाच्या पलीकडे असलेल्या शुद्ध ब्रह्माचे चाहते असतात त्यांना सामान्य माणसांसारखी प्रसिद्धीची हाव असत नाही.
सांगली जवळील पलूसचे संत धोंडीबुवा (त्यावेळी लोक त्यांचे संतत्व न जाणल्याने ‘वेडा धोंडी’ म्हणत असत) हे निरक्षर, गुराखी असूनसुद्धा स्वामी समर्थांच्या कृपेस पात्र झाले आणि संतत्वास पोहोचले. त्यांनीसुद्धा कधीच स्वामींच्या नावाचा प्रचार किंवा प्रसार केला नाही. म्हणून काही ते स्वामींचे शिष्य नाही असे म्हणता येत नाही. सामान्य मनुष्य प्रत्येक गोष्ट एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून आणि मानवी तर्कबुद्धि वापरून बघत असतो. ह्या संदर्भात काहीसे असेच झालेले आहे.
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना त्यांनी स्वत: पूर्णत्वाला पोहोचविलेल्या शिष्यांची यादी जगाला द्यायची आवश्यकता वाटली नाही तसेच त्यांच्या शिष्यांपैकी सर्वांनाच स्वामी समर्थच आमचे गुरू आहेत बरं का, असं जगाला छाती ठोकून सांगण्याची आवश्यकता वाटली नाही. कारण, ह्या सर्व गोष्टी मानवी उद्धारकार्यापुढे अतिशय गोण आहेत असे ते समजत होते. त्यामुळे गजानन महाराजदेखील स्वा्मी समर्थांचे शिष्य असू शकतात.
उपदेश – गजानन महाराज
महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये.
जेव्हा मुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सदगुरु नव्हेत असे सांगून् भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसऱ्या दिवशी पूजा करण्यास सांगितले. आश्चर्य हे की दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्याला झ्यामसिंगाहस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पथभ्रष्ट होऊ दिले नाही. महाराज हे अद्वैतसिध्दांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधिच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही.
शरीरयष्टी – गजानन महाराज
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती गजानन महरांची देहचर्या. लांब लांब पावले टाकीत सदनकाकडे घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती. पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व त्यास छापी अर्थाक कपडा गुंडाळलेली.खाण्याची आवड– महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमार्यदपणे चित्रविचत्र खावे तर कधी तीन- चार दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सिकपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्नभावाने त्याचेही सेवन करावे.
काहींच्या मते महाराज हे 1857 च्या ऐतिहासिक बंडातील स्वातंत्र्य सेनानी होते. काहींच्या मते ते सुप्रसिद्ध क्रांतिकारक तात्या टोपे होते. मात्र त्यास पुरावा नाही. काहींच्या मते समर्थ रामदास स्वामी पुन्हा एकदा महाराजांच्या रूपाने जन्म घेत झाले असे सांगितले जाते.
याविषयी महाराजांनी मौन बाळगणे हे सूचक लक्षण समजावे. वास्तविक पाहता महराजांचे राहणीमान वर्हाडी थाटाचे होते. तरीही काही प्रसंगी त्यांचे बोलणे अत्यंत स्पष्ट उच्चार व शास्त्रशुद्ध भाषा अशा पद्धतीचे असे. त्यांना चारही वेद मुखोदगत होते. खेडवळ भाषेसोबत क्वचित प्रसंगी उत्कृष्ट हिंदी व स्पष्ट इंग्रजीमध्ये त्यांनी संवाद साधल्याचे वर्णनही काही भक्तांच्या आठवणींमधून स्पष्ट झाले आहे. महाराजांना गायनकला अवगत होती.सर्व धर्मग्रंथाचे त्यांना आकलन झाले होते.
कोणत्याही घटनेविषयी सांगताना ते अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. मात्र त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. ते कुणासही उद्देशून बोलत नसत. त्यामुळे त्यांचे बोलणे आपल्याशी किंवा आपल्याविषयी आहे याचे भान व तारतम्य त्यांच्या भक्तांना बाळगावे लागे.
गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता. विठोबा घाटोळ नावाच्या त्यांच्या सेवेकऱ्याने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविणे असे प्रकार सुरू केले तेव्हा महाराजांनी त्याला धरून काठीने चांगलेच बदडून काढले, जेणेकरून त्याने मठ कायमचाच सोडून् दिला. अखेर सदगुरूचे पाय लाभून देखील त्याच्या दुर्दैवाने दूर झाले.
असेच लाडकारंज्याचा लक्ष्मण घुडे ह्यास गजानन महाराजांनी पोटदुखीच्या मरणप्राय वेदनांपासून मुक्त केल्यानंतर त्याने श्रींना स्वतःच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले; तेथे जरी त्याने श्रींचे उत्तमपणे स्वागत केले तरी “सारी संपत्ती आपलीच आहे, मी देणारा कोण?” असे म्हणत असताच ताटात काही रुपयेदेखील ठेवले होते; त्याचे हे दांभिकपणाचे वागणे महाराजांना मुळीच आवडले नाही. त्यावेळी त्याची परीक्षा पहाण्याकरिता गजानन महाराजांना त्यास “तिजोरीचे दरवाजे फेकून दे!”
असे म्हणताच घुडे चमकला आणि त्याला खूप आग्रह केल्यानंतर त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला आणि स्वतःच त्याच्या उंबरठ्यावर जाऊन बसला आणि महाराजांना म्हणाला,
“महाराज यावे | वाटेल ते घेऊन जावे ||” तेव्हा त्याचे ते दांभिक वर्तन पाहून महाराज तिथून उपाशी निघाले व म्हणाले, “माझे माझे म्हणशी भले | भोग आता त्याची फळे ||”. श्री महाराज म्हणाले, “मी येथे येऊन तुला दुप्पट धनसंपत्ती देणार होतो, परंतु ते तुझ्या प्रारब्धात नाही.” असे म्हणून श्री गजानन महाराज तिथून निघून गेले. त्यानंतर सहा महिन्यात लक्ष्मण घुडे कंगाल झाला आणि त्याच्यावर भीक मागण्याची पाळी आली.
मंदिरे – गजानन महाराज
महाराष्ट्रात सर्वत्र गजानन महाराजांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. श्री गजानन महाराजांचे मंदिर, ओंकारेश्वर महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करुन घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले.
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त १५ मिनिटांचा रस्ता आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे १७२ बसेस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बसेस चालतात. श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध आहे.
मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री ९.३० पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्य म्हणजे, येथे असलेली स्वच्चता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक.
दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून, दुपारच्या वेळी सर्व भकतांना भोजन प्रसाद वाटप केले जाते. भोजनस्थळ देखिल अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात. खरोखरच, जागजागी श्री महाराजांचे प्रेम जाणवते आणि ते देहात असताना त्यांचे आपल्याला दर्शन झाले नाही, ह्याची पुन्हा पुन्हा खंत वाटत राहते. स्वार्थाने बरबटलेल्या या कलियुगात, अशा थोर संतांची कीर्ति वाढत जाण्याचे कारण काय, तर त्यांचे भक्तांवरील निर्व्याज, निष्काम, निरपेक्ष प्रेम (अकारण कारुण्य).
भक्तांचा उद्धार व्हावा हीच, त्यांचे आचारविचार बदलावेत, त्यांना शाश्वत आणि अशाश्वत ह्यांमधिल फरक कळावा, त्यांच्या हातून साधना व्हावी आणि त्यांचे जन्म-मृत्युचे फेरे चुकावेत ह्या उदात्त हेतुने ते भक्तांना जवळ करतात. ते स्वत: निरपेक्षच असतात. अशा ह्या थोर सद्गुरु महाराजांचे वर्णन मी पामर काय करणार? खरी भक्ति करणाऱ्या भक्तांना त्यांचे अनुभव येतच असतात.
गोपाळ मुकींद बुटी यांचा वाडा, नागपुर
अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितलं “तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वर केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि तिथल्या देव मामेलदारला भेट आणि मग पुढे जा.”
स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटलं “हि भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असं भलतंच काय होतंय ?” असं मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला हि कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले.
महाराज त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवून म्हणाले “अरे तुझे जीवन पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले आहे. तुझ्या अंतरी अजूनही षडरिपु पशु बनून राहिलेले आहेत त्यांना दूर कर. अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा.”
पुजारी गहिवरून आला आणि त्याने वरती पहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्याने इकडे तिकडे बरेच शोधाशोध केली पण ती दिव्य विभूती त्याला काही भेटली नाही. पण आता तो अंतर्बाह्य शुद्ध झाला होता. इतके दिवस पोटभऱ्या पुजारी म्हणून तो रामाची सेवा करीत होता पण यापुढे तो श्रीरामचरणी मुक्ततेचा आनंद लुटणार होता.
गोपाळ मुकींद बुटी यांचा वाडा, नागपुर – गजानन महाराज
शेगांवचे श्री गजानन महाराज येथे वास्तव्यास होते. हरी पाटील त्यांना येथुन पुन्हा शेगांवला घेऊन जाण्यासाठी आले होते. तेंव्हा महाराज पाटील यांच्या समवेत शेगांवला गेले. मात्र बुटी यांच्या पत्निला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद, आणि बुटी यांना तुझ्या कुटुंबाला कधिही काही कमी पडणार नाही, असा आशीर्वाद देऊन गजानन महाराज शेगांवला गेले. श्री गजानन विजय ग्रंथात पोथीत हा उल्लेख आहे. शंभर वर्षापुर्वीचा वाडा आता पुर्वी सारखा कसा असेल. वाड्याच्या निम्म्या भागात बुटी यांच्या वंशजांनी नव्याने बांधकाम केले आहे. वाड्यात पुर्वी दवाखाना होता. आता वयस्कर आजी राहतात. असे आजुबाजुच्या नागरीकांनी सांगितले. वाड्यात प्रवेश केला आणि भव्य सभामंडप दृष्टीस पडला. महाराजांच्या काळची आठवण देणारा हा प्रासादिक वाडा आहे.
गजानन महाराजांची दुर्मीळ चिलीम आकोटात – गजानन महाराज
शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराज यांनी विस्तवाविना पेटवून दाखवल्याचे सांगितले जाणारी दुर्मीळ चिलीम आकोट येथील यात्रा चौकातील रहिवासी नंदकिशोर वडाळकर यांनी श्रद्धापूर्वक जपून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. संत गजानन महाराज हे सन १९०९ मध्ये आकोट तालुक्यातील मुंडगाव येथे झ्यामसिंह राजपूत यांच्या घरी थांबले होते. तेव्हा महाराजांच्या सेवेत तल्लीन झालेल्या सेवेकरी भक्त विष्णुपंत गोविंद पाठक (मुंडगाव) यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महाराजांनी प्रसादाच्या रूपात आपली चिलीम भेट दिली, असे ग्रंथात म्हटले आहे.
ही चिलीम पाठक यांनी आपला देह सोडण्यापूर्वी आपले विश्वासू सहकारी त्र्यंबकराव वडाळकर यांना देखभाल करण्यासाठी भेटस्वरूपात १९७८ मध्ये सोपविली होती. ही चिलीम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूचे वेष्टण आहे. बारीक रंगीत तारेचे सुंदर नक्षीकामसुद्धा केले असल्याचे चिलीम सांभाळणारे नंदकिशोर वडाळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यांच्या घरामध्ये ही चिलीम तसेच त्यावेळी मुंडगाव गजानन महाराजांचे सेवेकरी असल्याचा चांदीचा बिल्ला तसेच त्र्यंबकराव वडाळकर यांची आई कृष्णामाई यांनी श्रींना चरणस्पर्श करून घेतलेल्या चांदीच्या लहान पादुका एका काचेच्या पेटीमध्ये जतन करून ठेवल्या आहेत.
विशेष म्हणजे या चिलीमचा फोटोसह संदर्भ ‘दास भार्गव’ यांनी श्री गजानन महाराज चरित्रकोशामध्ये संशोधन व लेखन करताना ही चिलीम त्र्यंबकराव वडाळकर यांच्याकडे असल्याचा पान क्र. १५ वर उल्लेख केला असल्याची माहिती देण्यात आली. श्रींची दुर्मीळ चिलीम घरात आल्याने वडाळकर कुटुंबाने ती जीवापाड जपली आहे. दर गुरुवारी या चिलीमची पूजाअर्चा, अभिषेक करण्यात येतो. शेगाव येथीलश्री गजानन महाराजांच्या फोटोबद्दल काही विशेष
श्री गजानन महाराज
शेगांवचे मंदीरात राममंदीर समोरील सभामंडपात महाराजांचा भलामोठा फोटो होता. मूळगांवकरांनी काढलेला. खूप मेहनतीने त्यांनी तो काढला होता. तेंव्हा महाराजांनी त्यांना साक्षात्कार देवून तो पूर्णत्वास नेला होता. ज्या दिवशी मूळगांवकरांनी देह ठेवला त्याच क्षणाला तो फोटो (साखळी आणि तारेने बांधलेला) तूटून खाली पडला व पूर्णता: तूकडे तूकडे झाले.
त्याचप्रमाणे सध्या जो गादीजवळ फोटो ठेवलेला आहे नागपूरचे देशमूखांनी काढलेला आहे. अप्रतीम असा चमत्कारीक फोटो आहे तो. ज्यावेळी देशमुखांनी फोटो काढला होता त्यावेळी फोटो काढून पूर्ण झाला परंतु देशमुखांना फोटोतील डोळे (नजर) काही केल्या जमेना. देशमुख परेशान झाले. काय करावे काही सूचेना. मग एक दिवस देशमूख शेगांवला आलेे. मंदीरात काही चौकशी करू लागले. तत्कालीन व्यवस्थापक स्व. पुरूषोत्तम हरी पाटील ह्यांना भेटले.
त्यांना देशमुखांनी फोटोबद्दलची सगळी कहानी सांगीतली. तद्नंतर त्यांचे सल्यानुसार देशमुख आमचे घरी साधारणता: दूपारी ४/५ वाजता बाबांना भेटले. पून्हा सगळा व्रूत्तांत सांगीतला व ऊपाय विचारला. वडिलांनी त्यांना गादीसमोर बसून एक पारायण करा, तूम्हाला महाराजच प्रेरणा देतील असे सांगीतले. झाले तर मग देशमूख दूसरे दिवशी सकाळी लवकर ऊठून पारायणाला बसलेत. (ही गोष्ट कमीत कमी ४० वर्षापूर्वीची आहे). सकाळी लवकर ऊठल्यामुळे त्यांना ३-४ अध्याय झाल्यावर खूप झोप यायला लागली. काही वेळानंतर त्यांना महाराजांनी डोळे कसे काढायचे ह्याचे मार्गदर्शन केले. देशमूख खाडकन ऊठले नी त्यांनी सरळ नागपूर गाठले. घरी पोहोचताच फोटोला डोळे काढले. तद्नंतर तो फोटो त्यांनी संस्थानला सप्रेम भेट दिला.
चमत्कार पहा आजही गादीवरचा गजानन महाराजांचा फोटो आपण कोणत्याही कोनातून पाहीला तर महाराज आपल्याकडेच पहातांना दिसतात. हा प्रत्यक्षदर्शी अनूभव म्हणून कथन.
भ्रमंती – गजानन महाराज
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव , रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे . उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे .
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत . त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात . नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे . सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो . शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात.
तिम संदेश – गजानन महाराज
देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, “मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||.” यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले, “दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||.” देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यायामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.
शेगाव मंदिर
जीवनातील प्रत्येक वळणावर यशस्वी होणे हा ईश्वर भक्तीचाच रंग असु शकतो. आपण साधारण परिस्थितीत जगणारे माणसाच्या जीवनाची घडी केव्हा अस्ताव्यस्थ होईल , सांगता येत नाही ; परंतु सद्गुरु कृपा असेल तर तेही व्यवस्थित व्हायला वेळ लागत नाही. कोणत्याही कार्यात सफलता, यश, येणे ही त्याचीच कृपा म्हणावी. आपण फक्त अगाध निष्ठा, पुर्ण समर्पण आणि अतुट विश्वासाने त्याची भक्ती करावी आणि अशी संपन्नता, संपदा ज्याच्या अमुल्य जीवनात लाभली, तर तो खरोखरच उच्चकोटीचा संपन्न होईल आणि संपन्न सुखी झालाच. हे सद्गुरु परब्रम्ह परमेश्वरा श्री गजानना अशीच आम्हा भक्तावर तुमची कृपादृष्टी राहो.
यावरुन महारांजाचे भक्तावरील अपरंपार प्रेमच दिसुन येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे. देह त्यागुन महाराज ब्रम्हीभुत झाल्या कारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. ज्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आर्शिवाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. जेव्हा महाराजांना कळले की, त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येवुन ठेपली आहे. त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की, त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता; परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. व श्रीनी संजीवन समाधी शेगावीला घेतली.
समाधि – गजानन महाराज
जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला[ संदर्भ हवा ]. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, “आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||” लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते.
तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.
श्रोत :- santsahitya.in