आचार्य चाणक्य यांचा कानमंत्र, जीवनात करा या तीन गोष्टी ?

आचार्य चाणक्य यांचा कानमंत्र, जीवनात करा या तीन गोष्टी ?

 

आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्रज्ञ होते त्यांची कूटनीती जगप्रसिद्ध आहे. याच नीतीचा वापर करून त्यांनी मगध साम्राज्याचा अहंकारी राजा धनानंद याचा नाश केला होता.

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते त्यांची कूटनीती आजही तितक्याच प्रभावीपणे अंमलात आणली जाते. आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुम्हाला जीवनात चांगला काळ आणायचा असेल तर प्रथम तुम्हाला वाईट काळाशी लढावे लागेल. वाईट काळ माणसाची परीक्षा घेतो. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला भविष्यात सुखाची किंमत कळते. आचार्य चाणक्य यांनी वाईट काळाशी लढण्यासाठी काही नीती सांगिल्या आहेत. ता नीतीचे योग्य रीतीने पाळले तर संकटकाळात हानी टाळणे शक्य आहे. वाईट काळात कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या याबद्दल जाणून घेऊया.

संयम ठेवा

भीती माणसाला कमकुवत बनवते आणि हळूहळू ती आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवते. आचार्य चाणक्य म्हणतात की, आयुष्यात वाईट वेळ आल्यावर घाबरू नये. घाबरलेला माणूस यशस्वी होऊ शकत नाही. तो स्वत:ला वाचवू शकत नाही आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमताही गमावतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात वाईट काळही अशाच प्रकारे येतो ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते तसेच रात्रीनंतर दिवसही उजाडतो हे कायम ध्यानात ठेवावे. कधीकधी आयुष्यात वाईट दिवसांचे गडद छत्र असते, यादिवसात संयम आणि धैर्य बाळगणारा कधीही पराभूत होत नाही.

आत्मविश्वास गमावू नका

आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कितीही वाईट परिस्थितीतून बाहेर काढू शकते. समुद्रात कितीही वादळं आलं तरी जोपर्यंत जहाज पाण्याला आत शिरू देत नाही तोपर्यंत कुठलंच वादळ जहाज डुबवू शकत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. जर तुम्ही तुमच्या मनात जिंकण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मनात विजयाचा निश्चय असेल तर अंधाऱ्या खोलीतही खिडकीतून डोकावणारा प्रकाश यशाचा मार्ग सुचवू शकतो. जर तुम्ही मनातून पराभव स्वीकारलात तर तुम्हाला चांगल्या काळासाठी खूप संघर्ष करावा लागेल. वाईट काळात आत्मविश्वास हे सर्वात मोठे शस्त्र आहे.

धैर्य आणि साहसाने यश मिळेल

आत्मविश्वासानेच माणसाला धैर्य मिळते. यासोबतच जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा गांभीर्याने काम करा. वाईट काळात चुकीचा निर्णय घेतल्याने त्रास वाढू शकतो. म्हणूनच अत्यंत विचारपूर्वक पावले उचलली पाहिजेत. चांगल्या वेळेची वाट पाहावी ती नक्कीच येते.

नवीन माहिती

या वेळेत एवढीच माहिती उपलब्ध आहे