काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग
तीर्थक्षेत्र काशी वाराणसी , बनारस हे भारताच्या उत्तर प्रदेशराज्यातील एक शहर आहे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला ‘वाराणसी’ हे नाव पडले. काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. हे शहर बनारस, वाराणसी, काशी, अविमुक्त (शंकराच्या वास्तव्यामुळे), आनंदकानन/आनंदवन(शंकराला आनंद देणारे वन), काशिका, तपःस्थली, महास्मशान, मुक्तिक्षेत्र, रुद्रावास (रुद्राचे राहण्याचे ठिकाण), श्रीशिवपुरी वगैरे नावांनी ओळखले जाते.
येथील काशी विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते.हे शहर वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.जगातील सर्वांत जुने सलग वस्ती असलेले शहर अशी ख्याती असलेले गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर आहे. हे शहर, महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसविल्यामुळे यास ‘काशी’/’काशिका’ हे नाव पडले.
काशी मध्ये गंगाकिनारी बांधलेले घाट, त्यांची नावे :-
अमरोहा/अमरावगिरी/बाउली घाट, असी घाट, अहिल्याबाई घाट, माता आनंदमयी घाट, कर्नाटक घाट,
केदार घाट, खिडकी घाट, खोरी घाट, गंगामहाल घाट-१, गंगामहाल घाट-२,
गणेश घाट, गुलेरिया घाट (मूळ), गुलेरिया घाट/नया घाट, गोल घाट,
चेतसिंग घाट, चौकी घाट, चौसत्ती घाट, जलासेम (जलाशायी) घाट, जातरा घाट,
जानकी घाट, जैन घाट, तुलसी घाट, तेलियानाला घाट, त्रिपुरभैरवी घाट,
त्रिलोचन घाट, दरभंगा घाट, दशाश्वमेध घाट, दांडी घाट, दिग्पतिया घाट,
दुर्गा घाट, नंदेश्वर/नंदू घाट, नारद घाट, निरंजनी घाट,
निषाद घाट, नेपाळी/घाट, पंचअग्नी अखाडा घाट, पंचकोट घाट, पंचगंगा घाट,
पांडे घाट, प्रभू घाट, प्रयाग घाट, प्रल्हाद घाट, फुटा/नया घाट,
बद्रीनारायण घाट, बाजीराव घाट, बुंदी परकोट घाट, ब्रह्मा घाट, भदैनी घाट,
भैसासुर घाट, भोसले घाट, मंगलागौरी/बाला घाट, मनकर्णिका घाट, मनमंदिर घाट,
महानिर्वाणी घाट, मानससरोवर घाट, मीर घाट, मुनशी घाट, मेहता घाट,
राजा घाट, राजा ग्वाल्हेर घाट, राजेंद्रप्रसाद घाट, राणा महाल घाट, राणी घाट,
राम घाट, रावण/रीवा घाट, ललिता घाट, लली घाट, लाल घाट,
वत्सराज घाट, विजयनगर घाट, वेणीमाधव घाट, शाक्य घाट, शिवाला घाट,
(आदि)शीतला घाट, संकट घाट, सर्वेश्वर घाट, सिंदिया घाट, सोमेश्वर घाट,
हनुमान घाट, जुना हनुमान घाट, हनुमानगारदी घाट, हरिश्चंद्र घाट,
क्षेमेश्वर घाट.
काशी विश्वनाथ इतिहास
स्कंद पुराण या इ स पूर्व ५०० ते ९०० वर्षे जुन्या पुराणात काशीचे माहात्म्य आढळते. त्या काशीखंडात वाराणसीच्या आसमंतातील शैव मंदिरांचे वर्णन आहे. येथे काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिर पन्हा बांधले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला.
सवाई जयसिंगया विज्ञानप्रिय राजाने इ.स. १७३७ मध्ये बनारसमधील मानमंदिर येथे वेधशाळा उभारली होती. इ.स. १७८३ च्या आधीपासून काशीवर इंग्रजांचे राज्य होते. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी “एकनाथी भागवत” हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला.काशी येथील विद्वान आणि अभ्यासू लोकांच्या वास्तव्यामुळे भारतातले पहिले गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज इ.स. १७९१साली स्थापन झाले. येथे पारंपरिक व आधुनिक खगोलशास्त्रांतील अभ्यास होत असे. आज येथे बनारस हिंदू विद्यापीठ आहे.
काशी विश्वनाथ मंदिर –
काशी शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यांत प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.
इतर –
‘काश्यां तु मरणमुक्तिः’ – काशीत मरण आल्यास त्या जिवाला मुक्ती मिळते असा समज आहे.काशी, गया आणि प्रयागअशी त्रिस्थळी यात्रा करण्याचा रिवाज आहे.
भूगोलसंपादन करा –
काशीला गंगा, यमुना, सरस्वती, किरणा व धूतपापा या नद्या पंचगंगेच्या स्वरूपात आहेत.
संस्कृती –
प्रख्यात भारतीय संतकवी कबीर, रविदास आणि राम चरित मानस लिहिणारे तुलसीदास हे शहराचे रहिवासी होते. कुळुका भट्ट यांनी १५ व्या शतकात वाराणसीत राहून मनुस्मृती या नावाचे लिहिलेले पुस्तक आहे.वाराणसीमध्ये अनेक वर्तमानपत्रे आणि जर्नल्स आहेत. पहिले १ जून १८५१ रोजी प्रथम वाराणसीमध्ये प्रकाशित करण्यात आलेले आय.एस.बी.एन. आज नावाचे वर्तमानपत्र १९२० मध्ये पहिले हिंदी भाषेचे राष्ट्रवादी वृत्तपत्रम्हणून प्रकाशित झाले. हे वर्तमानपत्र भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मुखपत्र.
कला –
वाराणसी कला आणि डिझाईनचे एक प्रमुख केंद्र आहे. ब्रिटिश राजवटीतील लष्करी छावणीची स्मशानभूमी ही वाराणसीच्या कला व शिल्पांचे स्थान आहे.
संगीत –
प्राचीन आख्यायिकेनुसार, विकसित संगीत आणि नृत्य प्रकारांचे श्रेय शिव यांना जाते. मध्ययुगीन काळात, भक्ती चळवळी लोकप्रियतेत वाढ आणि वाराणसी सूरदास,कबीर, रविदास, मीरा आणि तुळशीदास या संगीतकारांचे उत्कर्ष केंद्र बनले.
सण –
महा शिवरात्रि रोजी शिवांची मिरवणूक महामृत्युंजय मंदिर ते काशी विश्वनाथ मंदिरा पर्यंत असते. हनुमान जयंती (मार्च ते एप्रिल) साजरी केली जाते. विशेष पूजा, आरती आणि सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन केले जाते. १९२३ पासून मंदिराच्या वतीने संगीत मोचन समरोह नावाचा पाच दिवसीय शास्त्रीय संगीत व नृत्य मैफिलीचे आयोजन करण्यात येते, ज्यात भारतातील सर्व भागातील आयकॉनिक कलाकारांना सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते.काशी नरेश पुरस्कृत नाटकं दररोज संध्याकाळी ३१ दिवस रामनगरात सादर केली जातात. उदित नारायण सिंह यांनी १८३० च्या सुमारास काशी नरेश ही परंपरा सुरू केली
श्रोत :- santsahitya.in