शनि शिंगणापूर

शनि शिंगणापूर

 

शनि शिंगणापूर मंदिराचा इतिहास

एके दिवशी एका मेंढपाळाला एक काळी दगडी शिळा दिसली. त्याने आपल्या हातातील काठीने जेव्हा त्या शिळेला टोचले, ते त्या शिळेतून रक्त येऊ लागले. पाहता पाहता हि बातमी सर्व गावात पसरली. गावकऱ्यांकडून या गोष्टीचे आश्चर्य व्यक्त केल्या जाऊ लागले.

मग त्या रात्री शनिदेव मेंढपाळाच्या स्वप्नात आले आणि गावात शनि मंदिर बांधायचे सांगितले. मंदिर बांधतांना मंदिराला कुठल्याही प्रकारचे छत नसावे हे सुद्धा देवाने सुचविले.

शिवाय दर शनिवारी न चुकता तेलाने माझा अभिषेक करावा, जर असे झाले तर मी स्वतः या गावाची रक्षा करेल असे देवाने सांगितले.

अशी कथा शनि मंदिराच्या स्थापणे मागे असल्याचे समजते. शनि देवाची मूर्तीची उंची सुमारे ५ फुट ६ इंच आहे. मूर्तीच्या सभोवती चौरस ओटा बांधलेला असून हे मूर्ती उभ्या स्थितीत आहे. या मूर्तीच्या शेजारी हनुमानाची मूर्ती देखील आहे.

शनि शिंगणापूर मंदिराची वेळ

भक्तांसाठी हे मंदिर २४ तास उघडे असते.

शनि शिंगणापूरचे उत्सव

तसं पाहता या ठिकाणी प्रत्येक शनिवारी मोठी गर्दी असते. परंतु शनि अमावस्या आणि शनि जयंती हे या ठिकाणचे प्रसिद्ध उत्सव आहेत. या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक देवाच्या दर्शनासाठी जमा होतात.

शनि शिंगणापूर मंदिराचे नियम :

शनि देवाच्या दर्शनासाठी काही नियम देवस्थानाच्या वतीने घालण्यात आलेले आहे :

शनि देवाचे दर्शन आणि पूजा फक्त पुरुषांनीच करावी.
भक्तांनी शेजारील पवित्र विहिरीच्या पाण्यानेच देवाचा अभिषेक करावा.
देवाचे दर्शन अंघोळ करून ओल्या कपड्यांनी घ्यावे.
देवाला तेलाचा अभिषेक करावा.
परंतु २०१६ साली मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महिला सुद्धा शनि देवाचे दर्शन घेऊ शकतात.

शनि शिंगणापूर या गावातील कुठल्याही घराला दरवाजा नाही :

दरवाजा नसलेले गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात कुठल्याही घराला दरवाजा नाही तसेच घराला कुणी कुलूप देखील लावत नाही. असे असूनही या गावात आज पर्यंत चोरीची घटना घडलेली नाही.

गावाची रक्षा साक्षात शनि देव करतात अशी मान्यता आहे. तसेच या ठिकाणी चोरी केल्यास चोर आंधळा होतो असे देखील मानतात.

शनि शिंगणापूरला कसे जायचे

या ठिकाणी रेल्वेने तसेच रस्ते मार्गाने पोहोचता येते. येथे येण्यासाठी आपल्याला अहमदनगर रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागेल. याशिवाय राहुरी, श्रीरामपूर आणि बेलापूर रेल्वे स्थानके सुद्धा येथून जवळ आहेत.

तसेच या ठिकाणासाठी विविध जिल्ह्यांतून बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे.

नवीन माहिती

या वेळेत एवढीच माहिती उपलब्ध आहे